मधु ताराच्या कार्याची प्रशंसा पनवेल येथील दैनिक वर्धापनदिनात.
दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दैनिक युवक आधार या नवीन पनवेल येथील वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना पत्रकार श्री संतोषजी लांडे साहेब यांनी आमंत्रित केले.
या वेळी राज्यभरातून पत्रकार मित्र तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मधु ताराच्या कार्याची दखल घेत दैनिक युवक आधारचे प्रमुख संपादक श्री संतोषजी आमले साहेब यांच्या हस्ते मधु तारा प्रमुख यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी मधु तारा सोबती निराधारांना सांभाळणारे निराधार सेवा सदन फाऊंडेशन पनवेलचे डॉ श्री संजयजी शर्मा.परिणीती फाऊंडेशन प्रमुख पनवेलच्या साक्षी सागवेकर.पनवेल क्राईम ब्रेंचचे पोलीस निरीक्षक श्री संजयजी चव्हाण साहेब.माहिती अधिकार व पत्रकार सौरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेशजी सारणेकर.राज्य संघटक प्राचार्य जगन्नाथजी रासवे.श्री संतोषजी लांडे.श्री सारंगजी महाजन.श्री गणेशजी दळवी.श्री विशालजी ताटके आदी उपस्थित होते.
टिप्पण्या