डॉक्टर दिपाली कुलकर्णी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील
डॉक्टर दिपाली संतोष कुलकर्णी हिची हेडेल बर्ग युनिव्हर्सिटीजर्मनी येथे इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ या विषयावर स्नातकोत्तर शिक्षणासाठी निवड झाली असून ती रवाना झाली. या विषयासाठी संपूर्ण जगातून वीस जागा असून भारता मधून तिची निवड झाल्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेलू शहरातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी व शिक्षक वसंतराव कुलकर्णी यांची ती नात आहे. भविष्यात WHO मध्ये सेवा व संशोधन करण्याचा तिचा उद्देश आहे.तिने मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी सुद्धा प्राप्त केली आहे.शिक्षण संभाजीनगर येथून केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.