माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियानात प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूची भव्य कामगिरी.
शिवाजी शिंदे
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू (जि. परभणी) यांची "माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा 2 अभियानात उल्लेख नीय कामगिरी करीत या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे.या अभियानाचा उद्देश शाळांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता, आणि पर्या वरणपूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा आहे. एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळा परिसरात हरित क्षेत्र वाढवणे, स्वच्छता मोहीम राबवणे, आणि शाळेच्या इमारतीची सुधारणा यासारख्या गोष्टींवर भर दिला.
शाळेच्या यशाबद्दल व्यवस्थापन, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पण्या