सुनियंत्रित आचरण हीच खरी श्रीमंती..! - रवींद्र केदार

तरुणांनी जग बदलणारे बहुआयामी व्यक्तिमत्व बनावं, यासाठी पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने श्रीमंत व्हा,असे प्रतिपादन उपक्रमशील शिक्षक श्री. रवींद्र केदार यांनी केले.
महावीर महाविद्यालय, बी. ए. बी. एड. विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.महादेव शिंदे हे होते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले, रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख  डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय  प्रात्यक्षिक समिती प्रमुख डॉ. शैलजा मंडले यांनी करून दिला.
महावीर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा सत्कार शाल -श्रीफळ वभेटवस्तू देऊ विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
श्री. हर्ष श्रीवास्तव याने आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. एम् एम् शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भविष्यात विद्यार्थ्यांपुढील येणारी आव्हाने सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजवर्धन गुरव व कु. प्रतीक्षा पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री. विपुल कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा.जयवंत दळवी ,डॉ. कल्पना गंगातीरकर , डॉ.संजयओमासे  ,  डॉ.शंकर धनवडे ,प्रा.अजितकुमार चौगुले , डॉ.शशिकांत अन्नदाते, प्रा.डॉ.अंकुश बनसोडे , एक दिवसीय प्राचार्य ऋषिकेश लोहार , एक दिवसीय समन्वयक प्रतीक्षा पाटील  तसेच प्रा.सूरज चौगले , प्रा.डॉ.संगीता महाजन, प्रा.डॉ.रोहिणी भोसले, प्रा. येरोळकर यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.