बुलढाणा जिल्ह्यातील हजारो वारकरी कीर्तनकार यांचे कोल्हापूर नगरीकडे प्रस्थान..
धर्मचिंतनाकरिता संत समावेश मंथन-कृती-विश्वगुरु देश
धर्मदंड आपुल्या हाती.. चिंतनातून नवी जागृती !
" संत समावेश"
आपण आपल्या संप्रदाय परंपरेनुसार चालणाऱ्या चातुर्मास्यय उपासनापूर्वक कार्यात स्वस्थ असाल. आशा आहे सध्या निर्वीघ्घ्रतापूर्वक आपला धर्मप्रसार, अनुष्ठान, प्रबोधनकार्य ही नियमित रूपाने सुरू असेल.
गेल्या काही महिन्यापासून आपल्या राज्यात व देशात निर्माण झालेले वातावरण व सामाजिक अस्वस्थता हे देशाच्या, समाजाच्या तसेच धर्म, संत महंत यांच्या विचारांमध्ये व सेवा कार्यात बाधा निर्माण करताना दिसत आहेत.
महाराष्ट्र ही संत व वीरांची भूमी ! श्री ज्ञानोबा-तुकोबां या व अशा अनेक संत, महंत, महात्मे व स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, यांचीही जन्म कर्म व त्यागभूमी !
जिथे वारकरी, भागवत सांप्रदायाच्या माध्यमातून अनेक संप्रदाय उपासनांचा संगम होऊन अबालवृद्ध स्त्री -- पुरुष, सर्व आश्रम व वर्ण यांना जातीभेद विसरून ज्ञान, भक्ती, कर्म व उपासनेचा सहज अधिकार दिला गेला.
संत वाङ्गयाचा व कार्याचा विपरीत, पूर्वग्रह दूषित अर्थ काढून सोयीनुसार इतिहास व वैचारिक साधनांचा वापर केला जात आहे. आमचा देव, धर्म, संत, महंत, राष्ट्रपुरुष, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मे यांचा पद्धतशीरपणे अवमान केला जात आहे. आमच्या धर्म जीवनावर अंधश्रद्धेच्या नावाखाली टीका केली जात आहे या सर्वांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.
आपण सर्वजण वेगवेगळ्या संप्रदाय, पंथ, परिवार, प्रतिष्ठान, समाज यांच्या माध्यमातून अविरत कार्य करीत आहोत व आपले उद्दिष्ट देखील एकच आहे ते म्हणजे राष्ट्ररक्षण, राष्ट्रउन्नती, धर्मरक्षण, समाज उन्नती आणि याच उद्दिष्टपूर्तीकरीता आपण सगळ्यांनी एकाव्यासपीठावर एकत्र येऊन सर्वांगीण चिंतन व्हावे याकरिता विविध पंथांचे, साधू, संत, महंत, वारकरी, आध्यात्मिक प्रमुख, मठाधिपती व विचारवंत यांच्याशी विचार विनिमय केल्यानंतर या "धर्म चिंतना करिता संत समावेश" या कार्यक्रमाचे आयोजन कणेरी मठ कोल्हापूर येथे सोमवार, दि. 30 सप्टेंबर व मंगळवार, दि. 01 ऑक्टोबर 2024 या दिवशी करण्यात येत आहे.व
बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार श्री पुरुषोत्तम महाराज पाटील अनिल महाराज चेके सारंगधर महाराज टेके श्री गजानन महाराज संस्थान बीबी व सागर महाराज बोंडे गोपाल महाराज टेके यांनी मठाधिपती
श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांना संत संमेलनासाठी नियोजन केले.... व बीबी येथे श्री गजानन महाराज संस्थान विश्वस्त व वारकऱ्यांचे हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले व प्रस्तान झाले....
टिप्पण्या