सेलूत संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर सुंदर देखाव्याचे सादरीकरण.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू :सेलू येथील अरुण रामपूरकर   दरवर्षी गौराई समोर समाज प्रबोधनपर देखावा सादर करत असतात.यावर्षी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर देखा व्याचे सादरीकरण केले आहे. पर्यावरण रक्षण, भूतदया, समाजातील अनिष्ट रूढींवर संत तुकाराम महाराज यांनी आप ल्या अभंगाद्वारे केलेले समाज प्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट,संत तुकारा म महाराज यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज,पालखी सोहळ्यातील रिंगण, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन या सर्व बाबींचा अंतर्भाव करत सजीव देखावा अरुण रामपूरकर यांनी साकारला आहे. देखा वा बघण्यासाठी फूलारी गल्लीतील त्यांच्या घरी झुबंड उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.