सेलू तालुक्यात पावसाचे विज वाऱ्यासह जोरदार थैमान.
शिवाजी शिंदे
बोथ येथे चार जण पाण्यात अडकले तर गिरगावला पाण्याचा वेढा.अनेक रस्ते बंद.
सेलू : सेलू शहरासह तालुक्यात पावसाने हा हाकार माजवला असून रविवार दि. एक सप्टेंबर च्या पहाटे दोन वाजल्यापासून पावसा ची सतत धार सुरू असू न रात्री दहापर्यंत जवळ पास १५० मी मी पावसाची नोंद झाली असावी त्यामुळे अति वृष्टी होऊन सेलू तालु क्यातील बोथ या गावात चार जण पाण्यात अडकले असून तालुक्यातील गिरगावला पाण्याचा वेढा पडला आहे. सेलू वालूर राजवाडी मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे. तर सेलू परभणी मार्ग निपाणी टाकळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे.प्रशास नाने एन डी आर एफ ला प्राचारण केले आहे. रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून पावसा ची सतत धार सुरू असून रविवारी रात्री दहा वाजे पर्यंत देखील पावसाची सतत धारच सुरू आहे त्यामुळे सेलू शहर आणि तालुक्यात बोथ येथे पुराच्या पाण्यात चार जण अडकले असून त्यांना वाचवण्याकरिता तसेच गिरगाव खुर्द या गावाला पाण्याचा वेढा पडला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सेलूचे तहसी लदार डॉ शिवाजी मगर यांनी एन डी आर एफ ची टीम अथवा पथक पाचारण केले असून लवकरच त्याकरिता प्रयत्नशील असल्याची माहिती तहसीलदार तथा तलाठी एम ए आष्टीकर यांनी दिली.
टिप्पण्या