यशासाठी सदृढ मन आणि बुद्धी गरजेची : प्रा.डॉ.जीवन पाटील . दि न्यू हायस्कूल मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
यड्राव (प्रतिनिधी ) :
शिक्षण हे संस्कारशील नागरिक बनण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांशी सुसंवाद स्थापित करणे गरजेचे आहे. सदृढ मन आणि बुद्धीच्या जोरावर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ.जीवन पाटील यांनी केले. दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे *"शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या"* या विषयावर आयोजित समुपदेशन व्याख्यानात प्राध्यापक जीवन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. ए. कोळी होते.
व्याख्यानात प्रा. डॉ. जीवन पाटील पुढे म्हणाले, शालेय जीवनामध्ये मनाची एकाग्रता आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि अन्य प्रसार माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा संतुलित वापर करावा. पालक व शिक्षकांशी आपल्या समस्यावर विद्यार्थ्यांनी संवाद करणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ.जीवन पाटील यांनी पालकांच्या समोर विद्यार्थ्यांना सदवर्तनाची शपथ दिली. त्यावेळी वातावरण भावनाशील झाले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बी. ए. कोळी म्हणाले की आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी व पालकांची मानसिकता बदलत चालली आहे. दोघांमधील संवाद समाप्त होत आहे. अशावेळी पालकांनी बाहेरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबर मैत्रीपूर्व संबंध ठेवले पाहिजेत. यावेळी पालक दीपक वस्त्रे व सौ.माधुरी लोकरे आणि विद्यार्थ्यांतून कुमारी जागृती पाटील व कुमारी दीक्षा इजगज यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक बी ए कोळी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये पर्यवेक्षक डी ए तराळ, प्रशालेचे शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन मच्छिंद्र आंबेकर सर यांनी केली होती.

टिप्पण्या