जिंतूर मध्ये 1 हजार 430 मुस्लिम बांधवांचे रक्तदान.
शिवाजी शिंदे
जिंतूर :दि.14 मिला दुन्नबी निमित्त शहरा तील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लि म समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.13) महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 1 हजार 430 महिला, तरुणांनी रक्तदान करुन शिबीरा स जोरदार प्रतिसाद दिला.इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंम्बर यांचा या महिन्यात जन्म असून त्याचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजा तील तरुणांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तपेढीचे कर्मचारी कमी अस ल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरु होते. या शिबीरात एकूण 1 हजार 430 तरुणांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास 150 महिलांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात माजी आमदार विजय भांब ळे,पृथ्वीराज भांबळे, गणेशराव काजळे, अॅड. मनोज सारडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला.रक्त संक लित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णा लयातील रक्तपेढी, जिंतूर ग्रामीण रुग्णा लय, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचा र्यांनी परिश्रम घेतले. हे शिबिर यशस्वी कर ण्यासाठी शहरातील सर्व खाजगी वैधकीय अधिकारी, रक्तपेढीची कर्मचारी, सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले.दरम्यान, शहरात भव्य रक्तदान शिबिर घेतले जात असल्याची माहिती मिळताच नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनि वाल, पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर, मौलाना जलील, मौलाना तजमुल, मौलाना सिराज, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नानासाहेब राऊत, प्रसादराव बुधवंत, राजाभाऊ नागरे, परभणीचे सय्यद अब्दुल कादर, बाळासाहेब काजळे, बालाजी शिंदे सोसकर, बालाजी शिंदे माजी सैनिक, ऍड. माधव दाभाडे, सुरेखा शेवाळे, लक्ष्मीकांत शेवाळे, लक्ष्मण बुधवंत आदींनी भेटी देऊन रक्तदान शिबिर आयोजक तरुणाचे अभिनंदन केले.
टिप्पण्या