मलिकवाड येथे बुद्धीबळ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण.

मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने.

मलिकवाड येथील सरकार विजयगड सरकार शहीद भगतसिंग विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशोत्सवानिमित बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेसाठी लहान गटात १० तर मोठा गटात ११ असे एकूण २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. राहुल देशपांडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिबळ स्पर्धेला सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात • आला. यासाठी प्रकाशराव देशपांडे, - संजय ठोंबरे, आसिफ मुल्ला यांनी बक्षिसाची रोख रक्कम दिली

आहे.

लहान गट स्पर्धेतील विजेते प्रथम आकाश नाईकवाडे असे (रा. गळतगावाडी) द्वितीय तन्मय टाकळे (रा. कारदंगा) तृतीय शौर्य पाटील याने क्रमांक पटकावला. प्रोत्साहनार्थ श्रुती कुन्नुरे, उत्तेजनार्थ वेदांत पाटील मोठा गट स्पर्धेतील विजेते असे प्रथम अभिजीत पाटील, द्वितीय मंजुनाथ कुंभार, तृतीय महेश फडतरे (रा.नणदी) प्रोत्साहनार्थ श्रेया नाईकवाडे, उत्तेजनार्थ अनिकेत पाटील या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला आहे. यावेळी युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.