लोअर दुधना प्रकल्प दोन दिवसात 70% भरले.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

आज प्रकल्पातून  पाणी सोडणार.

 सेलू : ता.2 तालु क्यातील लोअर -दुधना सिंचन प्रकल्पा तून सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रकल्पाचे काही दरवाजे उघडून दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.या प्रकल्पात 424.99 मीटर पाणीसाठा साठवल्या जातो. सद्यस्थितीत 274.203. दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 171. 603 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. प्रकल्पात 70.85% एवढा पाणीसाठा सोमवारी सकाळी आठ वाजे पर्यंत उपलब्ध झाला .त्यामुळे जालना पाटबंधारे विभागाने या प्रकल्पातून दुधना नदी च्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला,दुधना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे,या जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे,या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता काही दरवाजे उघडून 658 क्लासेस पाणी दुधना नदीच्या पात्रात सोड ण्यात येणार अस ल्याची माहिती पाट बंधारे खात्याचे कार्य कारी अभियंता एसबी कोरके यांनी दिली. परभणी जिल्हा महसूल प्रशासनाने दूधना नदी च्या काठावरील ग्राम स्थांना सतर्क राहण्या चा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.