शासकीय कार्यालयात तोडफोड प्रकरणी एकास अटक...

खोतवाडी तालुका हातकणंगले  येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रिंटर व प्लॅस्टिक खुर्च्यांची तोडफोड प्रकरणी स्वप्निल उर्फ बबन एकनाथ खोत यांचे विरोधात ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल उर्फ एकनाथ खोत त्यांना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की खोतवाडी येथील वार्ड नंबर एक गट नंबर 144 मध्ये एक विहीर असून त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीकडून गावातील घनकचरा व मुरूम टाकून ती विहीर मुजवण्याचे काम चालू होते परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यामुळे सदरच्या विहिरीत पाणी साठल्यामुळे व घनकचरा असल्यामुळे सदरच्या विहिरीतील पाण्याची दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वप्नील उर्फ बबन खोत यांनी ग्रामपंचायत खोतवाडी येथे जाऊन सदरच्या कामाबाबत विचारणा केली असता व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामसेवक कोठे आहे तुम्ही ग्रामसेवक आल्यानंतर या असे म्हणून ग्रामपंचायत लिपिक यांना दमदाटी करत टेबलवरील प्रिंटर व दोन खुर्च्या बाहेर घेऊन येत असताना ग्रामपंचायत शिपाई यांनी अडवणूक केलेले असताना देखील ग्रामपंचायतच्या बाहेरील आवारात पेविंग ब्लॉकवर  आढळून तोडफोड करण्यात आली त्याबाबत खोतवाडी ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे रीतसर गुन्हा दाखल केला असून शहापूर पोलीस ठाणे यांनी स्वप्निल उर्फ बबन एकनाथ खोत याला अटक केली असून पुढील तपास साबळे साहेब करीत आहेत.. विशालक्रांती वृत्तसेवा खोतवाडी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.