श्री जय भवानी नवरात्र मोहत्सव:सेलूतील श्री संत गोविंद बाबा चौकात भूमी पूजन कार्यक्रम संपन्न.
सेलू : सेलू येथील
श्री संत गोविंद बाबा चौक मठ गल्ली मंडप व भूमिपूजन आज धनंजयसिंह बायस ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले
यंदा मंडळाचे 41वे वर्ष आहे.मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष स्व.प्रकाशसिंह भैया ठाकुर यांनी 1984 वर्षी केली होती तेव्हापासून आज पर्यंत अखंडित पारंपारिक नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. यंदाही मोठ्या
उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. असे मंडळाच्या वतीने नागेश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी गणेशसिंह ठाकुर, रूपाली ठाकूर,मनीषा बायस, संध्या ठाकूर, अशोक शेलार, इंद्रजीत ठाकूर, आदित्य कुलथे ,रितेश शेंडुते,शक्ती बोराडे, विशू ठाकूर,संतोष नोकवाल, ओम गायकवाड, जतीन काकडे, शक्ती पवार,अर्जुन ठाकूर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या