जनवाड चे ग्राम प्रशासकीय अधिकारी (तलाठी )श्री प्रकाश काळगे यांना सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी पुरस्कार.

जनवाड वार्ताहर शितल कुडचे  , 
ता .चिकोडी येथील ग्राम प्रशासकीय अधिकारी तलाठी माननीय श्री प्रकाश भालचंद्र काळगे यांना नुकताच सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार महसूल विभागात प्रामाणिक व चांगली सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी महसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावेळी बेळगाव जिल्ह्यातून चिकोडी तालुक्या मधून जनवाड येथील तलाठी श्री प्रकाश काळगे यांना 2024 चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले 
श्री प्रकाश काळगे सर हे गेले अनेक वर्षे जनवाड ग्रामपंचायत मध्ये तलाठी म्हणून काम करत असते वेळी नागरिकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून सरकारी योजना प्रभावीपणे राबवत असतात यामध्ये पुर परिस्थिती असो गंजी केंद्र असो त्याचबरोबर सर्व व्यवस्थापन नागरिकांना सुखरूप स्थलांतरित करणे अशा कार्यातील ते नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन महसूल खात्याकडून उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार हा महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला त्यामुळे जनवाड. शमणेवाडी. नागराळ. बोरगाव आधी गावामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व नागरिकांतून एक समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.