सेलू ते अंतरवाली सराटी भव्य मोटर सायकल रॅली.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी. 

सेलू : आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी  सेलू ते अंतरवाली सराटी अशी भव्य मोटर सायकल रॅलीचे आज सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने अयोजन करण्यात आले होते.त्या अवाहनास प्रतिसाद देत सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी  लावावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे हे जीवाची बाजी लावून सातत्याने उपोषण करत आहे.परंतु हे सरकार ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी वेलकाढू पणा करीत आहे. मा.जरांगे पाटलाच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज  सेलू ते अंतरवाली सराटी अशी भव्य मोटर सायकल रॅली   सेलू इथून सातोना लिंगसा, कराळा आष्टी कुंभारी पिंपळगाव, घनसावंगी वडोगोद्री ते अंतरवाली सराटी अश्या मार्गे उपोषण स्थळावर म्हणजे अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. या रॅली मध्ये सकाळ पासूनच हजरो सकल मराठा समाजातील तरुण मुले, नागरिक आपली मोटारसायकल घेऊन  सेलूच्या नूतन महाविद्यालय क्रीडांगण मैदानावर उपस्थित राहून सह भागी झाले. दरम्यान कुठलाही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सोबत ॲम्बुलन्स ची सुविधा देखील करण्यात आली. आत्ता सरकारने लवकरात लवकर मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देऊन जरांगे पाटलांचे उपोषण सोडवावे.त्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून सरकार ने दक्षता घ्यावी नसता त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील अशी सकल मराठा समाजाने इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.