सदलगा शहरातील उच्च प्राथमिक विद्यालयातील सौ. रोहिणी शिंगे यांचा निरोप समारंभ व मीनाक्षी ढवळे यांचा स्वागत असा दुहेरी समारंभ आज प्रशालेत संपन्न.
सदलगा शहरातील कोयम्पु शालेय संकुलातील उच्च मराठी प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. रोहिणी शिंगे यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांना आज शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर प्रशालेत त्यांच्या जागी नव्याने हजर होत असलेल्या सौ. मीनाक्षी ढवळे यांचा स्वागत समारंभ ही यावेळी शालेय समितीच्या वतीने करण्यात आला.
नुकतेच प्रशालेत हजर झालेले मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान यांचाही सत्कार स्थानिक शालेय आजी-माजी विद्यार्थ्यांनी केला.
याप्रसंगी सौ. शिंगे मॅडम यांनी प्रशाळेला दूरदर्शन संच भेट म्हणून दिला. या दूरदर्शन संचाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये व अध्यापनामध्ये उपयोग होईल असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मड्डे यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बलवान सर, एस डी एम सी अध्यक्ष दिलीप करंगळे, शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब कदम, मलगोंडा पाटील, शिरीष अडके, रवी नाईक, राजू अमृतसम्मानावर , गीता कुंभार , सौ शास्त्री मॅडम सौ. वाली, सौ. एस बी पाटील इत्यादी मान्यवरासह अनेक विद्यार्थी पालक व आजी-माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना अल्पपहार देण्यात आला.
सदलगा शहर प्रतिनिधी,
अण्णासाहेब कदम.
टिप्पण्या