पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात साडी खरेदी करताना महिला कर्मचारी यांचा फोटो वायरल ... जिल्हाधिकारी यांचे कार्यालय बनले व्यवसायाचा अड्डा....

पुणे : जिल्हा अधिकारी कार्यालयात कार्यलयीन कामकाजा व्यतीरिक्त चक्क कार्यलयातच स्वतःला खरेदी करण्याचा अजब गजब शाॅपींग चालत आहे.
         
          ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता शासकिय योजनेची माहीती घेण्यासाठी कार्यालयात नागरीक गेले असता चक्क कार्यालयात साडी विक्रेता आणून खरेदी करताना जिल्हाधिकारी कार्यालयात A विंग चौथा मजला संजय गांधी योजना कार्यालयात साडी खरेदी / शाॅपींग करताना महिला कर्मचारी मग्न होत्या. साडीचा कलर, किंमत करण्यात इतक्या दंग होत्या कि आपण शासनाचे कर्मचारी आहोत हे विसरल्या....

         नागरिक माहिती घेत असताना तेथील महिला कर्मचारी नागरिकांकडे दुर्लक्ष करून शासकीय कार्यालयात शासकीय वेळेत चक्क शाॅपींग करत होते. त्यावेळी संजय गांधी योजनेच्या तहसीलदार रजेवर असताना त्यांच्या परस्पर कर्मचारी शासनाचा पगार घेऊन असा प्रकार होणे म्हणजे एक प्रकारे कार्यालयाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार चालला होता. असे नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वार्ताहर यांना माहिती दिली. 

           नागरिकांनी साडी खरेदी करत असताना फोटो व व्हिडिओचे चित्रीकरण सरकारी कर्मचारी यांच्या समोर केले तरीही तेथील कर्मचारी यांना थोडाही संकोच वाटला नाही उलट आम्ही गेलो २० वर्षों पासून साडी खरेदी करत असल्याचे महिला कर्मचारी यांनी सांगितले.

            या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचा कारभार जिल्हाधिकारी कार्यालयात होत असतो. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक ते राजकीय पुढारी व क्लास वन अधिकारी वर्ग यांचा वावर होत असतो. या ठिकाणी संवेदनशील, खडक शिस्तीचे पालकमंत्री असताना जिल्हाधिकारी कार्यालयात सिक्युरिटीच्या समोर साडी विक्रेता आत व्यवसाय करत असेल तर अधिकारी यांची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा घटनेने जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाची सुरक्षा यंत्रणा व कर्मचारी यांच्या वर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे नागरिक आशेने पाहत आहेत.

पुणे जिल्हाधिकारी - सुहास दिवसे.

           या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब निंदनीय आहे. मी दौऱ्यात आहे याची माहिती घेतो असे सांगितले 

तहसीलदार - अंजली कुलकर्णी.
संजय गांधी निराधार शाखा
तहसीलदार 

        या संदर्भात संजय गांधी योजनेच्या तहसीलदार यांना यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता मी रजेवर आहे. आमच्या स्टाफशी बोलुन माहिती घेऊन कळवते असे सांगितले. 

          या संदर्भात कर्मचारी यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ नेमकी कोणती कारवाई करणार याकडे पाहणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.