नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

अल्पसख्याक सेल
काँग्रेसद्वारे राणे यांना अटक करण्याची मागणी.

परभणी :दि.03भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्याचा येथील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्य मंत्री यांना पाठविलेल्या निवे दनातून राणे यांच्या विरोधात कठोर कार वाई करावी, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. राणे हे वारंवार तणाव निर्माण होणारे विधाने करीत आहेत, असेही नमूद केले. या निवे दनावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव इरफारनुर रहेमान खान, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्प संख्यांक विभागाचे सरचिटणीस अतिकऊर रहेमान, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी नगरसेवक मोईन मौली, माजेद जहागीरदार, मतीन मकसूद खान, मुसू खान, युसूफ खान, काजी इरशाद,अजहम खान, हाफीज शाकेर, शाकीर इनामदार, शाजी अहमद खान, डॉ. अफवान खान, सत्तार पटेल, विश्‍व जित वाघमारे, अझहर अफाक, मतीन खान, अरहम इनामदार, सम द मौली यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.