डासाळा येथे गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू तालुक्यातील रामनगर डासाळा येथे आज दि. 16 सप्टें.रोजी शंभु राजे प्रतिष्ठान एकता गणेश मित्र मंडळ रामनगर येथे सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने गणपती आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामनगर डासाळा येथे सर्व हिंदू मुस्लिम एकतेने राहतात हे आज पुन्हा एकदा पहावयास मिळालेलं जिवंत उदाहरण आहे. या गावांमध्ये कुणाच्याही सुखदुःखामध्ये अशाच एकरुपतेने सर्वजण मिळून कार्य करत असतात. या गावातून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की जात पात महत्त्वाची नसून माणुसकी धर्म हीच खरी जात आहे. शंभु राजे प्रतिष्ठान च्या वतीने वेळोवेळी काही ना काही उपक्रम राबवले जातात. आता च साजरा झालेला शिक्षक दिन सुद्धा पीएम श्री डासाळा येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आगळावेगळा साजरा करण्यात आला होता. आणि आज सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आरती व महाप्रसादाचे आयोजन सुंदर अशा पद्धतीने करण्यात आले होते. सर्व मुस्लि म बांधवांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे या गावानी सर्वाना एक एकतेचा संदेश दिला आहे आपण सर्व एक आहोत म्हणून जात पात न पाळता माणुसकी हाच धर्म आहे हे सर्वांनी आत्मसात करावे या कार्यक्रमाचे यशस्वीते साठी शरीफ शेख, असद पठाण, लतीफ सय्यद, समीर शेख, इरफान शेख, तालीम शेख, आरिफ सय्यद, सोहेल शेख , अखिल शेख, अल्ताफ सय्यद, अन्सार शेख, सलीम शेख , अमजद शेख, सलीम सय्यद ,अतिक सय्यद, रफिक शेख, चांदपाशा शेख, पाशाभाई शेख यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, उपाध्यक्ष कृष्णा नरवडे, अनिल हिवाळे, किरण गजमल, गणेश गिराम, अरुण साळवे, यादव राव दुधाट,अशोक गिराम,अजय गवारे, रोहन साळवे, बाळू भाले, गौतम पारवे यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या