किसान पीकेपीएसला ७.८५ लाखांचा नफापुंडलिक खोत : संघाची २८ वी वार्षिक सभा
मलिकवाड, ता. १५ : गेल्या २८ वर्षांच्या कालकिर्दीत लोकांचा विश्वास संपादन करत यंदा किसान प्राथमिक कृषी सहकारी संघाला ७.८५ लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक खोत यांनी दिली. ते संघाच्या २८ व्या वार्षिक सभेत बोलत होते.
मुख्य कार्यनिर्वाहक संभाजी माने म्हणाले, संघाचे सभासद ९०५, शेअर भांडवल ४५ लाख ६३ हजार, निधी ६३ लाख ६९ हजार, ठेवी ७ कोटी ९९ लाख ११ हजार, गुंतवणूक ५९ लाख ८४ हजार, शिल्लक ८ लाख ४२ हजार, कर्जवितरण ९ कोटी ७४
लाख ७० हजार, सभासदांना ९ टक्के लाभांश दिला जाणार आहे. ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्षा सिंधुताई पाटील, संचालक कुमार बाकळे, निवास करजगे, सावकर कुडचे, प्रकाश कोळी, बाबासो कोळी, आप्पासो संकपाळ, कृष्ण शिंदे, गणपती वडगावे, प्रकाश इंगळे, शंकर मंगावे, रणजित देशपांडे, भीमा वडगावे, सर्जेराव पाटील, कृष्णा आंबी, दत्ता वडगावे, भीमराव नाईक, सी. एम. कुडचे, बशीर मुल्ला, के. के. देशपांडे, कृष्णा संकपाळ, अमन इंगळे, आप्पा करजगे, भारत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले.
टिप्पण्या