खोतवाडी हायस्कुल, खोतवाडी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित, खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
    यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा यांनी आपल्या मनोगतातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवना विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
   या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार श्री.हेमगिरे एस.के.यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.