खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे शिक्षक दिन,शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी व शांतीगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे शिक्षक दिन, शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी व शांती गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली.शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर  स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक मा.श्री यासीन मुजावर सर यांनी केले.यानंतर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
      शिक्षक दिना निमित्त विद्यालयातील शिक्षकांच्या पाल्यांचे शिक्षण क्षेत्रात यश संपादन केल्या बद्दल सर्व शिक्षक पाल्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हनुन लाभलेले मा.श्री.ज्ञानेश्वर चंद्रकांत घुबडे यांची पी.एस.आय.पदी नेमणुक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न झाला.
    शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा शांतीगौरव पुरस्कार संपन्न झाला.विद्यालयातील सहा.शिक्षक श्री.सचिन मधुकर कांबळे व सहा.शिक्षिका सौ.सारिका गुणधर मगदुम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      पोलिस निरिक्षक मा.श्री.सचिन सुर्यवंशी, खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार,पी.एस.आय.पदी नेमणुक झालेले मा.श्री.ज्ञानेश्वर घुबडे यांनी आपल्या मनोगतातुन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.सागर चुडाप्पा सर यांनी आपल्या मनोगतातुन सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  या कार्यक्रमा प्रसंगी शहापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षर सचिन सुर्यवंशी, पोलिस गोपनिय अधिकारी मा.श्री.डोणे साहेब,पी.एस.आय.पदी नेमणुक झालेले मा.श्री.ज्ञानेश्वर घुबडे,खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार,माजी उपसरपंच गजानन नलगे,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.करण खोत,मा.श्री राजु घुबडे,मा.श्री.सुरेश घुबडे,मा.श्री.चंद्रकांत घुबडे,विद्यालयातील  विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.हेमगिरे एस.के. यांनी केले तर आभार श्री.समाजे सी.बी.यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.