एकसंबा शहरी पालिका स्वच्छता कर्मचारी दिन काल मोठ्या उत्साहात साजरा.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पट्टण पंचायत कार्यालय एकसंबा
 यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 23 सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून कार्यालयात साजरा करण्यात आला . प्रारंभी एकसंबा पटन पंचायत दिवंगत कर्मचारी कै. शंकर केरूमळी यांना उपस्थितांच्या वतीने मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रारंभी रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा सौ. सुजाता विनोद चितळे या उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी एकसंबा पट्टण पंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील सप्तसागरे हे उपस्थित होते.
 या कार्यक्रमाप्रसंगी
पट्टण पंचायत एकसंबा शहराचे नगरसेवक विठ्ठल नाईक, शाहिदा मुल्ला, प्रेमा माळगे, राजश्री मगदूम, रवींद्र माने, जमीरशहा मकानदार, चिदानंद बेळी, उमेश सातवार, श्रीमती कलावती माळगे, अंकुश खोत, संगीता पवार, शकुंतला रंगोळी, किरण माने शिवगोंडा बावणे, रवींद्र खोत. यांच्यासह पालिका कर्मचारी मुख्याधिकारी बि के तवशे, एस डी सी चंद्रकांत शिरगुरे, सी ई ओ सुंदर रोगी, आर आय प्रसन्न कुमार कल्याण शेट्टी, स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.