राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

गांधीनगर:  

वळीवडे येथील  कपिल मारुती घाटगे सदस्य,ग्रामपंचायत वळीवडे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्ताने मानवतवादी सांस्कृतिक चळवळ व दिक्षा चारिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय
 व जनसेवेच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी   केल्याबद्दल राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ राजर्षी शाहू स्मारक भवन,मिनी सभागृह,कोल्हापूर येथे मा.अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार  देण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भरत रसाळे,प्रा.किसनराव कुऱ्हाडे, मा.भरत लाटकर, मा. प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे, डॉ. सोमनाथ कदम या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 
      यावेळी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे  विश्वासराव तरटे,अंतिमा कोल्हापूरकर,अहर्त मिणचेकर, विशाल फुले  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.