माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा- गुणवंत मिसलवाड

नांदेड- कोणत्याही शासकीय, निमशासकीय, अनुदानित कार्यालयाकडे असलेली माहिती १२ ऑक्टोबर २००५ या कायद्यानुसार कागदपत्र मिळवणे म्हणजेच माहितीचा अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा होय असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २८ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना माहिती व्हावी आणि या कायद्याचा जनसामान्यांमध्ये प्रसार व प्रचार करण्यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, आणि ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रा.प.म. आगाराचे बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, सुनील मोरे, आनंदा कंधारे, वरिष्ठ लिपीक गुलाम रब्बानी, सौ. रेखा माचीनवार, सुनिता हुंबे, मनिषा कदम, नितीन मांजरमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार - कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.