मा.आ.विजयराव भांबळे यांच्या पाठीशी बंजारा समाजाने खंबीर उभे रहावे - महंत नेहरू महाराज पोहरा देवी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

बंजारा समाजासाठी कधीही कमी पडणार नाही- मा.आ.विजयराव भांबळे.

जिंतूर : बंजारा समाजाचे कुल दैवत आई जगदंबा माता यांचा भोग भंडारा कार्यक्रमाचे आयोजन मा.आ विजयराव भांबळे यांच्याकडून मौजे हलविरा ता.जिंतूर येथे करण्या त आले होते. याप्रसंगी बंजारा समाजाचे धर्म गुरु महंत नेहरू महारा ज तसेच महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज अमरगड, परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव साहेब, युवती जिल्हाध्यक्षा सौ.प्रेक्षा ताई भांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रमुख महंत नेहरू महाराज यांनी प्रवचन करताना संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेल्या धर्मतत्वावर आज बंजारा समाज चालत असून बंजारा समाज एकवचनी असल्याची साक्ष दिली. जिंतूर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून मा.आ.विजयराव प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन त्यांच्या अडी अडचणी सोडवतात त्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात अशा समाजाला न्याय देणाऱ्या आ.विजयराव भांबळे यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणु कीत पाठीशी खंबीर उभे रहा असे म्हणत महंत नेहरू महाराज यांनी डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. 
तर अमरगडचे महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी प्रवचन करताना आई जगदंबा माता, संत सेवाला महाराज, संत ईश्वर सिंह महाराज यांचा जयघोष करत संत रामराव बापू महाराज यांच्या साक्षीत मा.आ.विजयराव भांबळे यांनी जिंतूर तालुक्यातील अमरगड देवस्थानास तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला तसेच तीर्थक्षेत्राचा विकास केला. विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या अशा मा.आ विजयराव भांबळे यांना विधान सभा निवडणुकीत भरघोष मतांनी विजय करा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून उपस्थित असलेले खां.संजय जाधव यांनी बंजारा समाज दुर्गम भागात वास्तव्य करत असताना देखील त्यांच्या विकासाची कास धरणारे मा.आ. विजयराव भांबळे हे तुमच्या जवळचे आहेत. वाढेकरी जवळचा असावा म्हणून मा.आ. विजयराव भांबळे तुमच्या जवळचे आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहा असे मत व्यक्त केले.बंजारा समाज माझा नेहमीच पाठीशी उभा राहिला असून माझे वडील व माझ्या काळात देखील बंजारा समाज माझ्या सोबत होता. त्यामुळे मी यापुढे देखील कधीही कमी पडणार नाही व बंजारा समाजाचा विकास व समाजास न्यायदेण्यासाठी  कटी बद्ध राहील अशी ग्वाही आ.विजयराव भांबळे यांनी दिली.
तर बंजारा समाजाने पारंपारिक वेशभूषा, रूढी परंपरा, जपल्या असून मला प्रत्येक तांड्यांवर खूप प्रेम मिळते. मला बंजारा तांड्यावरील चाली रिती नेहमीच आकर्षि त करतात त्यामुळे माझे वडील व मला देखील बंजारा समाज मला कुटुंबासारखा वाटतो, जिंतूर तालु क्यात साठ तांडे असून प्रत्येक तांड्यावर वीज,पाणी रस्ता अशा सुविधा निर्माण केल्या, अमरगड येनोलीचा कायापालट मा.आ. विजयराव भांबळे यांनी केला. असे उद्गार सौ.प्रेक्षाताई भांबळे- बोराडे यांनी काढले.
या कार्यक्रम प्रसंगी विनोद महाराज टोकवाडीकर, कैलास महाराज चारठाणकर यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव राठोड घागरा माजी सभापती यांनी प्रास्ताविक मांडले तर कार्यक्रम प्रसंगी अॅड. संजय राव भांबळे, सौ. उज्वलाताई राठोड, विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते, प्रमोदराव भांबळे, राजेंद्रकाका लहाने, रामराव उबाळे, मनीषाताई केंद्रे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, आप्पासाहेब डख, बाळासाहेब भांबळे, शंकर जाधव, प्रवीण चव्हाण, आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे, सोनाली ताई राठोड, बंटी निकाळजे, गजानन कांगने,हरिभाऊ बुधवंत, मनोहर डोईफोडे मनोहर सातपुते, जगदीश शेंद्रे, प्रभाकर चव्हाण, अभिजित भांबळे, बाबाराव चव्हाण नवहाती, आश्रोबा चव्हाण, संतोष राठोड, सचिन राठोड, अविनाश मस्के, सलीम काझी, जलीलभाई इनामदार, माधव चव्हाण, साहेबराव राठोड, सुधारक रोकडे, रणजीत गजमल, विठ्ठल ताठे, जिवन आवटे, दिनकर सातपुते, संजय राठोड- कोठा,देवा राठोड, रामदास आढे, पंडित जाधव, शंकर गंजे यांच्यासह जिंतूर-सेलू तालुक्यातील बंजारा बांधव हजारोच्या संख्यने उपस्थित होते तर कार्यक्रमाची चोख व्यवस्था हलविरा येथील नागरिक यांनी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.