सदलगा येथे मुनीश्री 108 कुंथु सागर जी महाराज यांच्या अमृत वाणी पवित्र चातुर्मास प्रवचन पर्युषण महापर्व ४ ते १८ सप्टेंबर अखेर होणार मोठ्या उत्साहात संपन्न.

सदलगा प्रतिनिधी - सदलगा येथे चातुर्मास यानिमित्त आलेले परमपूज्य मुनीश्री १०८ कुंथुसागर महाराज यांच्या उपस्थितीत ४ ते १८ सप्टेंबर चातुर्मास पर्युषण महापर्व प्रवचन सोहळा संपन्न होणार आहे. सदलगा शहरी पवित्र चातुर्मास पर्युषण पर्व मुनी श्री 108  कुंथू सागर जी महाराज यांच्या उपस्थितीत सुरू होत असून त्यातील मुख्य कार्यक्रम खालील प्रमाणे- दिनचर्या पूजा, अभिषेक , तत्वार्थ सूत्र, शिबिरार्थ, तत्वार्थ सूत्र वाचन, प्रतिक्रमण,प्रवचन, आरती, सांस्कृतीक कार्यक्रम असा १६ दिवसांचा भरगच्च कार्यक्रम सदलगा शहरातील कल्याणोदय भवन शमनेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे. या महापर्वाची माहीती देण्यासाठी आज सदलगा शहरी कलबस्ती येथे आचार्य मुनीश्री 108 कुंतू सागर जी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजकांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मुनीश्री 108 कुंथु सागर जी महाराज यांनी मानवाच्या कल्याणासाठी तपश्चर्या महत्वाची. तपश्चर्येमुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळविता येते, तपाचरणाने सात्विकता वाढते, संयम वाढतो, विचार शुद्ध होतात, लहान मुलांना मातृवात्सल्याची जाणिव ही गत जन्माची शिकवण असते , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य, क्रोध, राग, लोभ हे गतजन्मीची शिकवणी या जन्मी शिशू वयात दिसत असते असे प्रतिपादन केले व पुढील प्रवचन पर्व व तेथील कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना  आचार्य श्री १०८ कुंथुसागरजी मुनी महाराज यांनी दिली. 
हा १६दिवसांचा चातुर्मास पर्युषण महापर्वाच्या प्रवचनाचा भरगच्च कार्यक्रम येथील कल्याणोदय भवनात होणार आहे. सर्व धर्मियांनी या प्रवचनातील अमृत वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांनी यावेळी केले.  कल्लबस्ती येथे समस्त पत्रकारांची बैठक घेऊन ही माहिती यावेळी प्रसार माध्यमांना देण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब कदम, तात्यासाहेब कदम, मकरंद द्रविड, सदाशिव मुतनाळे यांच्यासमवेत कार्यक्रमाचे आयोजक अक्षय पाटील, संतोष भोजे, रितेश पाटील, सुजाता प्रधाने, बेबा चौगले, शांता अष्टगे, सुनिता तारदाळे, उत्तम पाटील, चामराज बदनीकाई, सागर पाटील आणि महावीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदलगा शहर प्रतिनिधी, 
अण्णासाहेब कदम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.