पट्टण कोडोली मधील शाहु पार्क बेघर वसाहती मध्ये पहिल्यांदा गणपती मुर्ती प्रतिष्ठापना

पट्टण कोडोली, प्रतिनिधी - 
 मौजे पट्टण कोडोली येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज पार्क बेघर वसाहतीमध्ये पहिल्यांदाच नवीन मंडळ स्थापन करून गणपतीची  मोठी मुर्ती  बसवण्यात आली आहे MIDC रोड कॅनॉल ब्रीज येथे बेघर वस्ती आहे लाईट आणि पाण्याची सोय झाल्यामुळे अनेक गावातील लोक आपल्या प्लॉट वर घरे बांधुन राहत आहेत मागच्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी भरपुर घरे झाली आहेत
      अश्यातच सर्व कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन ह्या वर्षी गणपती मुर्ती बसवली आहे त्यामूळे बेघर वसाहती मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे त्या मुळे अजु बाजूचे सर्व लोक ह्या मध्ये उत्साहाने भाग घेत आहेत तसेच महीला वर्ग गौरी ची गाणी म्हणण्याचा कार्यक्रम देखील होत आहे ज्या ओसाड माळावर कधी काळी चिट पाखरू देखील फिरत न्हवते तिथे आज मात्र नंदनवन फुलले आहे त्या मुळे सर्व कुटुंबातील लोक आरती साठी व इतर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थितीत राहत आहेत व लहानांपासून ते मोठ्या पर्यन्त सर्वजण मंडळा मध्ये सहभागी होत आहेत आणि पहिल्यांदाच महाप्रसाद चे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे त्या साठी सर्वांनी देणगी व धान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.