महाआरोग्य शिबिर लाटेत मोठ्या उत्साहात संपन्न. हजारो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

अब्दुललाट प्रतिनिधी -


जागृती युवक संघटना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाटेत महा-आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर  *गुरुकुल स्कूलच्या आवारात* मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
जागृती युवक संघटनेचे *मा. रोहन ठिकणे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ क्षमा ठिकणे यांच्या संकल्पनेतून* या शिबिराचे आयोजन केले गेले होते. या दोघांचा व मंडळातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
महाआरोग्य शिबिरात जिल्ह्यातील *पायोस हॉस्पिटल, जे जे मगदूम हॉस्पिटल, स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दीप सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सी पी आर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अ.लाट* या दवाखान्यांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी, औषधी, इसीजी व कन्सल्टिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
*शिबिरात न्यूरो सर्जन, मेडिसिन, ऑर्थोपेडिक, नेत्रतज्ञ, कान नाक घसा तज्ञ, हृदयरोग तज्ञ व जनरल सर्जन* अशा प्रकारचे विविध तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते.
शिबिराचे उद्घाटन *लोकप्रिय खासदार मा. धैर्यशील दादा माने* यांनी केले. दुपारच्या सत्रात तालुक्याचे *लाडके आमदार मा. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर* यांनी शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिबिराचे *संयोजक श्री रोहन ठिकणे, ग्रामपंचायत सदस्या सौ क्षमा ठिकणे*, सदस्य श्री जितेश पाटील, सदस्य श्री सुरेश बेडक्याळे, सदस्य श्री अभिजीत पाटील मड्डे, सदस्य राधिका भाट, सदस्या वर्षा पाटील, सदस्य वर्षा  कदम, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश मलमे, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते  प्रा.श्री चंद्रकांत मोरे सर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, तालुकाप्रमुख सचिन डोंगरे, जिल्हा वैद्यकीय शिबिर समन्वयक कृष्णा लोंढे, गुरुकुल चे चेअरमन श्री गणेश नायकुडे, यड्राव बँकेचे सीईओ श्री श्रीशैल नायकुडे, श्री दीपक भाट, पत्रकार श्री अंकुश पाटील डॉ. अरुण कुलकर्णी,यड्रावकर गटाचे श्री विद्याधर कुलकर्णी, श्री दशरथ काळे सर, श्री एस के पाटील तात्या, श्री महावीर सांगावे, श्री. कल्लप्पा कुमठोळे, माने गटाचे   श्री.संजय परीट सर, पायगोंड पाटील, समगोंड पाटील,दत्ता कारदगे भाऊसाहेब कदम,सौ. माधुरी टाकारे, डॉ. राजेंद्र बैरागी,जागृती युवक संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मिलींद कुरणे, महावीर गाडवे, आण्णासो कचरे,सागर अवघडी गावातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.