हुपरी येथे सख्या भावाने केला खून ; दोघेजण ताब्यात
हुपरी येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यानेच कौटुंबिक कलह, वाटणी व व्यावसायिक स्पर्धेतून मित्राच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे व शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी जलदगतीने तपास यंत्रणा राबवून काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी भाऊ पवन सुकुमार हालुंडे (वय २६) व त्याचा मित्र आनंदा शिवाजी खेमलापुरे (२२, दोघेही रा. वाळवेकरनगर हुपरी) यांना पोलिसांनी रविवारी रात्रीच संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर घटनास्थळावरून लंपास केलेली सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदीचे दागिने आनंदा खेमलापुरे याच्या घरातून जप्त केले. हुपरी पोलिसांनी या दोघांना अटक करून पुढील तपासांसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
टिप्पण्या