कुरूंदवाड शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद.

कुरूंदवाड प्रतिनिधी - कुरूंदवाड शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे त्यांच्यावर हल्ला करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत शिवाय आठ दिवसात म्हशीच्या गोठ्यात शिरून दोन रेडकांना त्यांनी ठार मारल्याने शहरातील नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून होत आहे.

   कुरुंदवाड येते भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात झाल्याने आठ दिवसापूर्वी बाळू देवकाते यांची 1 वर्षाची रेडी कुत्र्याने फाडून ठार केली तसेच शनिवारी सकाळी चेतन माळी व तुषार पट्टेकरी यांच्या प्रत्येकी एक रेडी गोट्यामध्ये शिरून हल्ला करत त्यांना ठार केल्याने जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे भटक्या कुत्र्यांचा वावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  लहान मुलांना चावणे त्यांच्या अंगावर हल्ला करणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत मोठ्या माणसांच्या ही अंगावर धावून जाण्याच्या घटनाही घडत आहेत रिंग रोड आदर्श नगर जिजाऊ नगर यशस्वी नगर या उपनगरातून असे प्रकार घडत आहेत वारंवार तक्रार करून ही नगरपालिका प्रशासन याबाबत काही ठोस पावले उचलत नाही नागरिकांच्या पेक्षा कुत्र्याची जीवन मह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.