एकसंबा, मलिकवाडला गौरीचे थाटात आगमन

प्रतिनिधी - अमर माने मलिकवाड,
मलिकवाड, येथील एकसंबा, मलिकवाडसह, परिसरात पारंपरिक पद्धतीने महिलांकडून गौरीचे आगमन करून घरी आणण्यात आले.गेले दोन दिवसापासून परिसरातील महिलांनी चाफा, गोवर, हळदीचे पाणी, शंकरोबा,  दुर्वा, आगाडा मक्याचे तुरे यासह, गौरीसाठी लागणारे विविध साहित्याची जुळवाजुळवीच्या तयारी सुरु होते. मंगळवारी  सकाळी प्रत्येक गल्लोगल्ली महिला एकत्रित जमून गोवर भरणीच्या कामात गुंतले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता गौरीची गाणी गात गवापासून जवळ असलेल्या बोरवेल, विहिरी याठिकाणी जाऊन गौरीची पूजन करण्यात आले. यावेळी बाल चिमुकले विविध रंगीबेरंगी साड्या नेसून लुडबुड करताना दिसत होते. सायंकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य गौरी गणपतीला दाखवण्यात आले. रात्री सार्वजनिक गणेश मंडळा ठिकाणी झिम्मा फुगडी, घागर फुंकणे, गौरीची विविध गाणी गात फुगडीचा खेळ खेळण्यात आला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.