कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुप तर्फे नृसिंहवाडी पवित्र दत्तदेवस्थान येथेसिताफळ, लिंब, आंबा, गुलाबाची झाडे लावून वृक्षारोपण

ArliEn kA कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुप तर्फे नृवासिंहवाडी पवित्र दत्तदेवस्थान येथे
फळ झाडे सिताफळ लिंबाचे झाड कलमी आंबा हापूस आंबा गुलाबाची झाडे अशी  नाना तऱ्हेची झाडे लावून वृक्षारोपण केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार यांनी उपस्थित लोकांना निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाकडून झाडांकडून कशी सकारात्मक ऊर्जा मिळते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन मिरज सोनी गावामध्ये भवानी मंदिर येथ प्रस्थान केले. 
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ. रोहिणी अमोल पराडकर यांनी तिथे जमलेल्या महिलांना
आज कालच्या महिला सुरक्षित आहेत का? त्यांच्यावर होणारे अत्याचार या विषयावर 
काही प्रश्न विचारून चर्चासत्र आयोजित केले. 
तिथे जमलेल्या गावातील महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि आपले विचार मांडले. 
तेथील शाळेतले शिक्षक अध्यक्ष व सरपंच ताई शारदा यादव याही हजर होत्या.
सुलोचनाताई व सरपंच शारदाताई यांचा 
शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सौ. सुलोचना पाटील ताईंनी केले होते. तसेच होम मिनिस्टरच्या खेळात भाग घेऊन विजेत्या महिला सौ .अश्विनी उल्हास पाटील यांना पैठणी जिंकण्याचा मान मिळाला . 
ऋचा महाबळ ताईंच्या मन दर्पण पुस्तकाचे प्रकाशन झाले. 
तेथील महिलांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करून कार्यक्रमाची सांगता झाली .

सौ.रोहिणी अमोल पराडकर 
कोल्हापूर 9767725552

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.