लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाचा घाला.

लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. अवैध उत्खनन केलेल्या खाणीत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्याने बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. बेडसे (ता. मावळ) येथे घरघुती गणपती विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (दि. १२) रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. 


संजय धोंडू शिर्के व आदित्य संजय शिर्के (वय २१, रा. बेडसे, ता. मावळ) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत. वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सर्वत्र लाडक्या बाप्पाला भक्तिभावात निरोप देत असताना बेडसे (ता. मावळ) गावात गणपती बुडवताना घडलेल्या दुर्घटनेने ऐन उत्सवात गावावर शोककळा पसरली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत घराजवळील अवैध उत्खननात साचलेल्या पाण्यात घरातील गणपती बुडवण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वत्र हर्षाचे वातावरण असताना या दुर्घटनेने मात्र शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गणपती बुडवण्यासाठी हर्षद हा पाण्यात उतरला. परंतु दीर्घकाळ तो बाहेरच न आल्याने त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु अवैध उत्खनन असल्यामुळे तिथे पाण्याची खोली जास्त होती. दोघांनाही याचा अंदाज न आल्याने त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. पुढील तपास कामशेत पोलीस करत असून या अवैध उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.