मलिकवाड रयत सौहार्दला १३ लाखांचा नफाअध्यक्ष भाऊसो कुडचे : १५ वी वार्षिक सभा

प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.
मलिकवाड, ता. १५ : येथील रयत क्रेडिट सौहार्द सहकारी संघाला यंदा १३ लाख ६ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना २५ टक्के लाभांश दिला जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भाऊसो कुडचे यांनी दिली. ते संघाच्या १५ व्या वार्षिक सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक पुंडलिक खोत होते. विश्वनाथ पाटील यांनी स्वागत केले

मुख्य व्यवस्थापक प्रशांत मठपती अहवाल वाचनात म्हणाले, संघाचे सभासद ७०३, शेअर भांडवल ७ लाख ३ हजार, राखीव व इतर निधी ७७ लाख १९ हजार, ठेवी ९ कोटी ६० लाख १३ हजार, कर्जवितरण ६ कोटी ८७ लाख २० हजार, बँक ठेव गुंतवणूक ३ कोटी ४० लाख २० हजार असून वडगोल, केरुर शाखा उत्तमरित्या कार्यरत आहेत.

काशिनाथ कुडचे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. निलकंठ निडगुंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष बाळू पाटील, संचालक आप्पासो नाईक, आनंदा पाटील, सुभाष खोत, उमेश मठपती, प्रमोद टाकमारे, संजय कट्टीकर, कुमार जाधव, जयश्री पाटील, अश्विनी करजगे, संभाजी पाटील, शिवचंद एकुंडे, प्रवीण नोकरे, यलगौंडा पाटील, तोसिफ बेळकुडे, कुमार मांगतुरे, रावसाहेब धनवडे, ऐनूल मुल्ला, राजशेखर बाकळे, राजू अंकले, बाबासो पाटील, धोंडिराम वंजिरे, सुभाष शिरोळे, निंगाप्पा शिंदे, बाळ मुल्ला, सुभाष देसाई, परशुराम कोळी, महादेव वडगावे व नागरिक उपस्थित होते. वैभव खोत यांनी प्रास्ताविक केले. संभाजी माने यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.