सेलू बसस्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनीक्षेपक सुरू करणे.
शिवाजी शिंदे
बसण्यासाठीआसन व्यवस्था करण्याची मागणी.
सेलू : दि. 18 आज रोजी सेलू येथील बस स्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनिक्षेपक मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वयस्कर लोक, महिला, बसने ये जा करणारे शाळेतील विद्यार्थी, तसेच ज्यांना वाचता येत नाही. अशांना अनेक अडच णी येत आहेत. सेलू हे मोठे शहर असून बस स्थानकाची इमारत खूप मोठी आहे. पण माहिती देणारे ध्वनि क्षेपक बंद असल्यामु ळे ही फक्त शोभेची वस्तू बनली आहे. प्रवासांना बसण्यासा ठी आसनाची व्यवस्था ही फारच तोकडी आहे. अबाल वृद्धांना बसण्यासाठी आसनाची आणखी गरज आहे. सेलु बस स्थानकावरील ध्वनि क्षेपक ताबडतोब सुरू करण्यात यावे व प्रवाशांची गैरसोय थांबवावी. तसेच बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नाही व जी आसन व्यवस्था आहे ती मोडकळीस आली आहे त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने जमिनीवर बसावे लागत आहे करोडो रुपये खर्चून बस स्थानकाची नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे पण त्यात सुविधांचा अभाव आहे तरी तात्काळ बस स्थानका तील ध्वनिक्षेपक व आसन व्यवस्था येत्या १५ दिवसात करण्यात यावी नसता सेलू बस स्थानकामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण् यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जयसिंग शेळके, शिवम गटकळ,त्रिंबक पितळे, संजय सोळंके, वैभव आवटे, किसन खनप टे, दत्ता गाते व विद्या र्थी उपस्थित होते.
टिप्पण्या