पूर्व जोगेश्वरीचा गणनायकाचे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात साजरा
मंगलमूर्ती गणरायाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जनता कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ६६ व्या वर्षात पदार्पण करताना अत्यानंद होत आहे. हा आनंद जरी आम्ही साजरा करीत असलो तरी हा आनंद पूर्व जोगेश्वरीतील तमाम जनतेचा आहे. ज्यांनी या मंडळावर प्रेमाची सावली ठेवून व यथाशक्ती सहकार्य करून हे महान कार्य वृद्धिगंत करण्याचे कार्य केले आहे. त्यामुळेच मंडळाला उज्वल परंपरा लाभली आहे. या पुढेही आपल्या आशिर्वादांच्या विश्वासावर आमची वाटचाल सुरूच राहणार आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला पाहिजे या चळवळीतून मंडळाची स्थापना झाली. त्या चळवळीतून प्रेरणा घेवून लहान थोर कार्यकर्त्यांनी हा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सेवेचा वसा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जपला आहे. गेल्या ६५ वर्षातील मंडळाच्या कार्याचा विस्तार पाहता इवल्याशा रोपाचे वटवृक्षातील रूपांतरात आपण तन,मन, धन अर्पण करून सहकार्य केलेले आहे.
आबालवृद्धांचा, गरीब श्रीमंताचा, राजा महाराजांचा श्री गणेश " पूर्व जोगेश्वरीचा गणनायक नवसाला पावणारा गणपती " म्हणून आपल्या गणरायाची ख्याती, भक्ती भावाचा सुवास व मंडळाचे अविरत भरीव कार्य सर्वदूर पसरत आहे. त्यामुळेच मंडळ प्रतिवर्षी विविध पुरस्कारांने, अभिनंदनाने सन्मानित होत आहे. आम्हाला वाटते ते पुरस्कार अभिनंदन एका कार्यकर्त्यांचे नाही, तर मंडळ स्थापनेपासून तमाम कार्यकर्त्यांच्या ६५ वर्षांच्या घामाचे जिगिषेचे आहे. आम्ही तर या सर्वांचे फक्त विश्वस्त आहोत. गणेशोत्सवाच्या काळात कार्यकर्त्यांना येणारा अनुभव हा त्यांना आयुष्यभर पुरणारा असतो. कार्यक्रम ठरवणं , त्यांची आखणी करणं, बारीक सारीक गोष्टीचा विचार करून नियोजन करणं, अडचणी आल्या तर त्यावर मात कशी करायची? हे शिकणं हा कार्यक्रम साठी समृद्ध करणारा अनुभव असतो. हा अनुभव त्यांच्या वैयक्तित आयुष्यातील कामी येतो आहे. ज्या परिस्थितीत काम करणं, संकटावर मात करत पुढे जाणे आणि जे मिळत त्याचा उत्सव करत सगळ्यांना आनंद देणं. यापेक्षा आयुष्यात दुसरं काय पाहिजे? " गणेशोत्सव " हा याच आनंदाची पेरणी करणारा, आयुष्याचं उत्तम नियोजन करायला शिकवणारा उत्सव आहे.
या पुढेही अशीच प्रेरणा व सहकार्य आमचा आनंद द्विगुणी त करेल अशी आशा बाळगतो. आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी घालून दिलेला हा वसा खाली पडू न देता या पुढेही पूर्व जोगेश्वरीच्या गणनायकाकडे एकच मागणे मागतो लहानपण देगा देवा I मुंगी साखरेचा रवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश परब, खजिनदार दिपक रेडकर, सरचिटणीस प्रल्हाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळागौरी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा झाला. श्री साई सिद्धी महिला मंडळाच्या महिला अध्यक्ष सौ.मानसी महेंद्र केळकर सौ. अनिशा चंद्रेश त्रिभुवन सौ. दिपा विलास त्रिभुवन व तांच्या सहकारी यांनी मंगळागौरीचा हा कार्यक्रम करून जसे एक उत्साह निर्माण केला कोरोनामुळे कार्यक्रम झाले नव्हते पण मंगळागौरी यांच्या कार्यक्रमाने जोगेश्वरीतील महिला व पुरुषांच्या मध्ये एक चैतन्य निर्माण झाले.आपले उत्सव कमिटी २०२४ चे अध्यक्ष ओंकार कदम, खजिनदार राजेश लोके, सरचिटणीस प्रकाश साळवी यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
तसेच आदित्य जाधव, विलास देसाई व त्यांचे सहकारी ही नवीन युवक पिढी यांनी यापुढेही त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडावे यासाठी त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आव्हान यावेळी बोलताना त्यांनी केले. बुधवार दिनांक
४ /९ /२०२४रोजी मंडळाच्या अभ्यासिका वास्तुचा जिर्णोद्धार व गणेश मैदानाच्या शुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन ही माननीय खासदार श्री रवींद्र वायकर साहेब (मा. खासदार, मा. पालकमंत्री ) यांच्या फंडातून करण्यात आले. प्रमुख उपस्थिती सौ.मनीषा रवींद्र वायकर यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
६६ व्या वर्षाच्या निमित्ताने इतकेच म्हणू, पूर्व जोगेश्वरीचा गणनायक आपल्याला सुखी - संपूर्ण दीर्घ आयुष्य देवो I आणि आम्हाला त्या दिर्घायुष्यापर्यंत तुमचे सप्रेम आशीर्वाद. धन्यवाद I
आम्ही जपतो परंपरा.... आणि संस्कृती....
टिप्पण्या