दानोळी येथील कलगोंडा कवंदे यांच्या म्हैशींने दोन मादी रेडीनां दिला जन्म .
यड्राव (प्रतिनिधी ) दानोळी ( ता . शिरोळ ) येथील प्रतिष्ठित नागरीक कलगोंडा आण्णा कवंदे यांच्या घरच्या देशी म्हैशींने चक्क दोन मादी रेडीनां जन्म दिला . कवंदे कुटूंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला , व कवंदेसह कुटूंबीयांत एक आनंदाचे वातावरण पसरले . कलगोंडा कवंदे व त्यांचे कुटूंबीय यांना जनावरांची फार आवड आहे . तसेच ते आपल्यासारखीच या मुक्या जनावरांची काळजी व देखभाल करत होते . त्यांची घरची देशी जातीची म्हैस आहे . या म्हैशींने पहिल्यांदा एक रेडीला जन्म दिला होता . हिच म्हैस दूस-यांदा गाभण राहीली तेव्हांपासून कवंदे हे तीची देखभाल व काळजी घेत होते . सदर म्हैशींने दहा महिने सात दिवस घेऊन चक्क दोन मादी रेडीनां जन्म देऊन कवंदेसह कुटूंबीयांना आनंदाचा धक्काच दिला . सध्या म्हैस व दोन रेडी हे सुखरूप व्यवस्थित आहेत . दानोळी गावात हि वार्ता पसरताच नागरीक आश्चर्यचकित होऊन पहाण्यासाठी गर्दी करत होते .
टिप्पण्या