पीएम श्री जि प के प्रा शाळा डासाळा येथे शिक्षक दिन साजरा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन साजरा करण्यात आला.

सेलू : दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी पीएम श्री जि प केंद्रीय प्राथमिक शाळा डासाळा या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली व श्री चक्रधर स्वामी यांचा अवतरण दिन मोठ्या उत्साहात व आगळावेगळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुशील भैया शिखरे यांनी अध्यक्ष पद भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनगर येथील शंभूराजे प्रति ष्ठानचे संस्थापक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुनील हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती शंभु राजे प्रतिष्ठान व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयो जन करण्यात आले होते निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट व वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट असे तयार करण्यात आले होते. निबंध स्पर्धेसाठी माझ्या नजरेतील उद्याचा भारत व आदर्श शिक्षक असे दोन विषय देण्यात आले होते व वक्तृत्व स्पर्धे साठी मोबाईल शाप की वरदान हा विषय देण्यात आला होता या दोन्ही स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविले
निबंध स्पर्धा गट एक वर्ग चौथी ते सहावी
प्रथम क्र.- करण दत्ता त्रय गजमल, द्वितीय क्र.- आरती विठ्ठल कदम,तृतीय क्र वेदिका गजानन गजमल, 
गट क्र दोन वर्ग सातवी ते नववी प्रथम क्र.- मानवी हनुमंत गजमल द्वितीय क्र.- अक्षदा दीपक खराबे, तृतीय क्र- ऋतुजा ज्ञानेश्वर बोंबले वक्तृत्व स्पर्धा गट क्र. एक वर्ग चौथी ते सहावी प्रथम क्र- गायत्री रामराव गज मल द्वितीय क्र.- स्वरा उद्धव गजमल तृतीय क्र.- सांची प्रकाश भालेराव गट क्र.  दोन इयत्ता सातवी ते नववी 
प्रथम क्र. - प्राची अंगद गजमल द्वितीय क्र- साक्षी भगवान गजमल 
तृतीय क्र.- अभिनव ताराचंद खराबे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यां ना शालेय शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून सुनील हिवाळे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुनील हिवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मी या शाळेचा एक माजी विद्यार्थी आहे तसेच समाजासाठी काहीतरी देणं आहे म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये म्हणून त्यांना मदतीसाठी नेहमी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक वृंदाना शंभूराजे प्रतिष्ठान शालेय शिक्षण समिती व गावकऱ्यांच्या वतीने सुंदर असे रोपटे व पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षण समिती गावक री व बालासाहेब बोंबले, कृष्णा गजमल गजानन गजमल, रविराज गजमल, मतीन सय्यद, प्रभाकर घोडे, शिवाजी घोडे, जगन्नाथ गजमल, नारायण बागल, इदरीसभाई शेख, दीपक खंदारे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.