"लाडकी बहिण' सारखे मानधनाची विमा सुरक्षा कवच पत्रकारांनाही द्या !
छरुपती संभाजीनगर (प्रतिनिधी) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार शासकीय योजनांची माहितीजनतेपर्यंत पोहचवतो. जनतेवर झालेल्या अन्यायाल वाचा फोडतो. अशा या संघर्ष प्रिय पत्रकारांना योग्य आर्थिक संरक्षण, मनधान, विमा सुरक्षा कवच शासनातर्फे देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मंगळवारी करण्यात आली.
राज्यपाल महोदय छत्रपती संभाजीनगर येथे आलेले असताना ऑल इंडिया संपादक संघाने त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले, निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोर्डे, शहर अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हा सचिव रवी बनकर, ऍड,संतोष मिमरोट यांच्या निवेदनावर सह्या आहेत
टिप्पण्या