पंढरपूरला जातो असे सांगून नांदणीतून महिला बेपत्ता
नांदणी (ता शिरोळ) येथील श्रीमती शकुंतला बबन माळी वय 53 वर्षे या 3 जुलै 2024 रोजी घरातून पंढरपूरला जातो असे सांगून त्या निघून गेल्या असून अद्याप परत आले नसल्यामुळे बेपत्ता असल्याची वर्दी किशोर बबन माळी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे
नांदणी बाजारपेठ येथील श्रीमती शकुंतला बबन माळी या 3 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरात पंढरपूरला जातो असे सांगून त्या निघून गेल्या अद्याप परत आल्या नाहीत अंगाने सडपातळ चेहरा उभट उंची 5 फूट अंगात पिवळ्या रंगाची सहावारी साडी पिवळा ब्लाऊज पायात चप्पल हातात बेन्टेक्स बांगड्या कानात पिवळ्या धातूची सोन्याची फुले डोळ्यावर नंबरचा चष्मा असे त्यांचे वर्णन आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहे.
टिप्पण्या