नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे लवकरात लवकर काढा, नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी करता दहा हजार सानुगून अनुदान द्या,कामगार संघटनांची मागणी

इचलकरंजी प्रतिनिधी - नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे लवकरात लवकर काढा, नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी करता दहा हजार सानुगून अनुदान द्या, पेटी व भांडी वाटप इचलकरंजी मध्ये सुरू करा या मागणीसाठी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज दिनांक 20 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त मा.  जानकी भोईटे यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन देण्यात आले 
           इचलकरंजीतील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये अतिशय धीम्या गतीने कामे सुरू आहे या कार्यालयाकडे विविध लाभाचे ११४९२, नवीन नोंदणीचे 9712 व नूतणीकरणाचे 8590 अर्ज पेंडिंग आहेत. लाभाचे तर  नोव्हेंबर 2023 पर्यंतच तपासणी केली आहे. यामुळे येथील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती करिता या  कार्यालयात हेलपाटे  घालावे लागत आहेत. सदरचे सर्व अर्ज आठ दिवसात तपासणी करून निकाली न काढलेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला 
          यावेळी शिष्टमंडळात राजेंद्र निकम, आनंदा गुरव आकाश बनसोडे, परसराम कत्ती, महेश लोहार, अविनाश चव्हाण, बेगम नदाफ, सलमा शेख, शाहीन खानापूरे, सुवर्णा शींदे आदी  कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.