धनेगावच्या अंडरग्राउंड रस्त्यासाठी आमदार बोर्डीकरांकडे मागणी.
शिवाजी शिंदे
आमदार मेघना बोर्डीकरने तात्काळ
रेल्वे मंत्र्यांना फोन करून केली मागणी.
सेलू :तालूक्यातील सेलू-परभणी रेल्वे ट्रॅक वरील सेलू रेल्वे स्थानकापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सेलू वरून धनेगावकडे जाणाऱ्या अंडरग्राउंड रस्त्यासाठी आमदार मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना फोन करून रस्ता तयार करून शेतकरी व धनेगाव ग्रामस्थांची अडचण दूर करण्या साठी साकडे घातले.
गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील धनेगाव व सेलूतील शेतकऱ्या नी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली व तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या कार्य क्षेत्रात येणाऱ्या या अंडरग्राउंड रस्त्या अभावी शेतकरी व ग्रामस्थांचे होणारे हाल याचा पाढा वाचला आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तात्का ळ दखल घेऊन केद्रीय रेल्वे मंत्र्याना फोन करून शेतकरयांच्या व्यथा मांडल्या, तसेच दमरे नांदेड चे डी. आर.एम. यांच्या शी संपर्क करून तातडीने संबंधित अंडरग्राउंड रस्ता तयार करण्या बाबत सुचना दिल्या.
या वेळी धनेगाव चे उपसरपंच श्याम कटा रे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, अनुप गुप्ता, गणेश गोरे, विशाल लोया, सुरेश खेत्रे, श्रीधर खेत्रे, व्यंकटेश काबरा, सुर्यकांत जाधव,जकी पठाण, बाळू खेत्रे, हारून बागवान, श्री हरी कटारे, बबन भोसले, सुखानाना कटारे, रमेश खेत्रे, जब्बारभाई ,रंगनाथ काळे विशाल गोरे आदी धनेगावचे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या