सामाजिक बांधिलकी वाढवावी--इंजि.बी.एस.कोलते.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलूत अभियंता दिनानिमित्त अभियं त्यांचा कार्य गौरव.
श्रीराम कंस्ट्रक्शनचा उपक्रम.

सेलू : समाज व देशा च्या सांस्कृतिक व भौतिक विकासात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, आधु निक काळातील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन काम करण्यासाठी  सामाजि क बांधिलकी वाढवावी असे आवाहन इंजि. भास्करराव कोलते यांनी केले. येथील श्रीराम कंस्ट्रक्शन व स्टोन क्रशरच्या वतीने अभियंता दिन व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त १५ सप्टेंबर रविवार रोजी कुपटा येथे आयोजित  सत्कार समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सां.बा. विभागा चे उपअभियंता बळीराम माने, इंजि. सतिश बलदवा, इंजि.
दिपक कुपटेकर, इंजि. संग्राम सोनी, शामराव मते माजी बांधकाम सभापती, ज्ञानेश्वर राऊत संचालक कृषी उत्पन बाजार समिती, इंजी. पृथ्वीराज भांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियंता दिना निमित्त श्रीराम कंस्ट्र क्शनच्या वतीने सेलू- जिंतूर तालुक्यातील सर्व अभियंत्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पांडुरंग धामण गावकर,बालाजी उदावंत  यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांनी अनुभव, कामाची गुणवत्ता व एकमेकांच्या सहका र्याने विकास  करण्या चे आवाहन केले. कार्य क्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष इंजि सुशील नाईवाडे, सुत्र संचालन सुभाष मोहकरे तर ज्ञानेश्वर मते यांनी आभार मानले. या वेळी इंजि. आर.जे.पठाण,गंगाधर आडळकर , प्रशांत माणकेश्वर,प्रशांत सोन्नेकर,रवी मंत्री,
गजानन आडळकर, भगवान कुमावत, शेख आर्शद, हादी अन्सारी, योगेश गजमल, शेख मुजमिल, अभिमन्यू घुगे, शेख अनिस, शेख रेहान , तेजस कडे, प्रशांत इंगोले, अब्दुल राफे, प्रध्मुन राठोड, राहुल सोलापूरे,युनुस शेख,असलम मोदी, शेख अझहर,शेख फरहान,अनुराज मालाणी, यासेर शेख,उदय दडके, पुरूषोत्तम शिदे मामा ,प्रमोद कुलक र्णी,विनीत माला नी,योगेश गजमल,
मधुकररावपौळ,
भगवानराव जाधव,
बालचंदानी,रोहन आकात,संदीप आडळ कर, सिध्दू खोसे पाटी ल,शंभू काकडे,बाबा
राव वायाळ आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम कंस्ट्रक्शनचे संचालक दत्तात्रय सोळंके, नितीन सोळंके,कैलास राऊत,ओमराजे मते, विठ्ठल झांजे, रामेश्वर शेवाळे, शिवाजी शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.