पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलींच्या कबड्डी संघासाठी जिल्हा प्रभारी मंत्र्यांची आर्थिक मदत

इमेज
रायबाग : तालुक्यातील हिडीकल गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळा सुरणावर थोटा येथील १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाला बेळगावी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रोत्साहन दिले.   रविवारी गोकाकाच्या हिल गार्डन स्वग्रहात शाळेचे मुख्याध्यापक बी.  एम मेनसी यांच्या नेतृत्वाखाली 10 मुलींच्या संघाची भेट घेत असताना मंत्री महोदयांनी त्यांचे अभिनंदन केले आणि विजयपुरा येथे होणाऱ्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक मदतीसाठी शुभेच्छा दिल्या.         चेन्नडसच्या भटक्या समाजातील मुलींच्या या संघाने रायबाग तालुकास्तरीय कबड्डी मेळाव्यात प्रथम क्रमांक व चिक्कोडी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले.  4 ऑक्टोबरपासून विजयपुरा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.  चिक्कोडी लोकसभा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.   या प्रसंगी याच शाळेचे जुने विद्यार्थी बंड्या साहित्याचे डॉ.  यल्लाप्पा हिमाडी, युवा नेते बसवराज सायन्नावर, समाजसेविका मं...

बुलढाणा जिल्ह्यातील हजारो वारकरी कीर्तनकार यांचे कोल्हापूर नगरीकडे प्रस्थान..

इमेज
प्रतिनिधी - सारंग महाजन धर्मचिंतनाकरिता संत समावेश मंथन-कृती-विश्वगुरु देश धर्मदंड आपुल्या हाती.. चिंतनातून नवी जागृती ! " संत समावेश" आपण आपल्या संप्रदाय परंपरेनुसार चालणाऱ्या चातुर्मास्यय उपासनापूर्वक कार्यात स्वस्थ असाल. आशा आहे सध्या निर्वीघ्घ्रतापूर्वक आपला धर्मप्रसार, अनुष्ठान, प्रबोधनकार्य ही नियमित रूपाने सुरू असेल. गेल्या काही महिन्यापासून आपल्या राज्यात व देशात निर्माण झालेले वातावरण व सामाजिक अस्वस्थता हे देशाच्या, समाजाच्या तसेच धर्म, संत महंत यांच्या विचारांमध्ये व सेवा कार्यात बाधा निर्माण करताना दिसत आहेत.   महाराष्ट्र ही संत व वीरांची भूमी ! श्री ज्ञानोबा-तुकोबां या व अशा अनेक संत, महंत, महात्मे व स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, यांचीही जन्म कर्म व त्यागभूमी ! जिथे वारकरी, भागवत सांप्रदायाच्या माध्यमातून अनेक संप्रदाय उपासनांचा संगम होऊन अबालवृद्ध स्त्री -- पुरुष, सर्व आश्रम व वर्ण यांना जातीभेद विसरून ज्ञान, भक्ती, कर्म व उपासनेचा सहज अधिकार दिला गेला. संत वाङ्गयाचा व कार्याचा विपरीत, पूर्वग्रह दूषित अर्थ काढून सोयीनुसार इतिहास व वैचारिक साधनांचा वापर...

खंबाटकी घाटात ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे मोठा अपघात . सारंग महाजन

इमेज
प्रतिनिधी - सारंग महाजन  जिल्ह्यातील तालुका खंडाळा खंबाटकी घाटात  कंटेनर ची कारला  जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. अपघात झाल्याची बातमी कळताच टायगर पोलीस मित्र संघटना महा राज्य अपघातग्रस्त परिवारास पोलीस प्रशासनाच्या मदतीने तसेच टायगर पोलीस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे, कार्याध्यक्ष अक्षय भाऊ मोगरे, भोर तालुका अध्यक्ष विराज वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात ग्रस्त परिवारास त्वरित व तातडीची मदत करण्यात आली यावेळी वाई तालुका पदाधिकारी पारस पवार, पियुष भोजने  शंतनू डेरे, साहिल जगताप आदी सदस्य उपस्थित होते.

जनवाड चे ग्राम प्रशासकीय अधिकारी (तलाठी )श्री प्रकाश काळगे यांना सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी पुरस्कार.

इमेज
जनवाड वार्ताहर शितल कुडचे  ,  ता .चिकोडी येथील ग्राम प्रशासकीय अधिकारी तलाठी माननीय श्री प्रकाश भालचंद्र काळगे यांना नुकताच सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार महसूल विभागात प्रामाणिक व चांगली सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी महसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावेळी बेळगाव जिल्ह्यातून चिकोडी तालुक्या मधून जनवाड येथील तलाठी श्री प्रकाश काळगे यांना 2024 चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले  श्री प्रकाश काळगे सर हे गेले अनेक वर्षे जनवाड ग्रामपंचायत मध्ये तलाठी म्हणून काम करत असते वेळी नागरिकांशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून सरकारी योजना प्रभावीपणे राबवत असतात यामध्ये पुर परिस्थिती असो गंजी केंद्र असो त्याचबरोबर सर्व व्यवस्थापन नागरिकांना सुखरूप स्थलांतरित करणे अशा कार्यातील ते नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याचा आढावा घेऊन महसूल खात्याकडून उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून पुरस्कार हा महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला त्यामुळे जनवाड. शमणेवाडी. नागराळ. बोरगाव आधी गावामधून त्यांच्यावर शुभेच्छ...

सेलू आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयामध्ये हिंदी पंधरवाड्याचा समापन समारोप.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या वतीने 17 ते 30 सप्टेंबर या काळात हिंदी पंधरवाडा निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आज दिनांक 30/09/2024 रोजी सोमवार समापन समारोप करण्यात आले अधिकत्तम हिंदी शब्द स्पर्धेत प्रथम शमशोदिन शेख, द्वितीय नागेश पुराणिक तृतीय जाकेर शेख याना मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाऊसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) तर प्रमुख अतिथी म्हणून योगेश जयभाये उपस्थितीत होते. या प्रसंगी या पंधरवाड्या त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेतील विजेत्यांना शाखा प्रबंधक व प्रमुख अतिथी हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी प्रभाकर भांडवले,  सुभाष राठोड, अजय पुंडलिक, शिवाजी अघाव, प्रजापती जगताप,समीर थोरात, कृष्णा बोराडे, अमर पाटील, भालचंद्र बरडे, मन्मथ देवढे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने,संदिप जाधव,दत्ता सरकटे, बबन झोल आदि उपस्थित होते.

मा.आ.विजयराव भांबळे यांच्या पाठीशी बंजारा समाजाने खंबीर उभे रहावे - महंत नेहरू महाराज पोहरा देवी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  बंजारा समाजासाठी कधीही कमी पडणार नाही- मा.आ.विजयराव भांबळे. जिंतूर : बंजारा समाजाचे कुल दैवत आई जगदंबा माता यांचा भोग भंडारा कार्यक्रमाचे आयोजन मा.आ विजयराव भांबळे यांच्याकडून मौजे हलविरा ता.जिंतूर येथे करण्या त आले होते. याप्रसंगी बंजारा समाजाचे धर्म गुरु महंत नेहरू महारा ज तसेच महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज अमरगड, परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव साहेब, युवती जिल्हाध्यक्षा सौ.प्रेक्षा ताई भांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रमुख महंत नेहरू महाराज यांनी प्रवचन करताना संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेल्या धर्मतत्वावर आज बंजारा समाज चालत असून बंजारा समाज एकवचनी असल्याची साक्ष दिली. जिंतूर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून मा.आ.विजयराव प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन त्यांच्या अडी अडचणी सोडवतात त्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात अशा समाजाला न्याय देणाऱ्या आ.विजयराव भांबळे यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणु कीत पाठीशी खंबीर उभे रहा असे म्हणत महंत नेहरू महाराज यांनी डोक्यावर हात ठेवत आशीर्...

मलिकवाडात विद्युत तारेचा स्पर्श होऊन एकाचा जागीच मृत्यु.

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने. मलिकवाड येथील रहिवासी पृथ्वीराज गणपती केरुरे वय 17 वर्षे याचा शनिवारी सकाळी वीज भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला. त्याच्या पक्षात आई-वडील, दोन बहिणी, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने मलिकवाड गाववर शोककळा पसरली आहे.

माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा- गुणवंत मिसलवाड

इमेज
नांदेड- कोणत्याही शासकीय, निमशासकीय, अनुदानित कार्यालयाकडे असलेली माहिती १२ ऑक्टोबर २००५ या कायद्यानुसार कागदपत्र मिळवणे म्हणजेच माहितीचा अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा होय असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २८ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना माहिती व्हावी आणि या कायद्याचा जनसामान्यांमध्ये प्रसार व प्रचार करण्यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, आणि ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रा.प.म. आगाराचे बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, वाहतुक नियंत्रक बाल...

सेलूत तालुक्यातील कीर्तनकार व कथाकारांचा भव्य सत्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  माजी आमदार विजयराव भांबळे यांचा पुढाकार. सेलू : सेलू तालुक्यातील किर्तनकार व कथाकार  तसेच बाल किर्तन कारांचा  भव्य सत्कार सोहळा माजी आमदार विजयराव भांबळे  यांच्या वतीने पार पडला.गुरूवार २६ सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळा परिसरातील मैदानात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वारकरी संप्रदायामध्ये उल्लेख नीय कार्य करत समाज प्रबोधन करून समा जाचे हित जोपासणा ऱ्या तालुक्यातील कीर्त नकार व कथाकार यांच्या सोबतच बाल किर्तनकारांचा देखील  यावेळी सन्मान करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्या त आले .यावेळी माजी आमदार ,विजयराव भांबळे ,माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकराव काकडे , प्रेक्षाताई भांबळे, माऊलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालूरकर दत्तराव महाराज सोन्नेकर,जयराम महाराज तांगडे ,प्रसाद महाराज काष्टे, राजेंद्र लहाने,नामदेव डख , प्रकाश मुळे,सुधाकर राव रोकडे ,पप्पू गाडेकर  ,पुरुषोत्तम पावडे ,रघुनाथ बागल  आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी माजी...

सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती,मात्र शीतल करदेकर आमरण उपोषणावर ठाम!

इमेज
शिंदे- करदेकर फोन वरुन संवाद,मुख्यमंत्र्यांशी भेट व मागण्यांवर  ठाम.        पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे. बुधवार दि.१०जुलै २०२४ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे.त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.  पण शीतल करदेकर आपल्या मागण्यांवर ठाम राहत जोपर्यन्त  मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डाची घोषणा होत नाही,महामंडळासाठी १.५ ची आर्थिक तरतुद करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे ठाम पणे सांगितले.        पात्रुडकर यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून शीतलताई यांच्याशी बोलणे करून दिले.यावेळी शीतलताई म्हणाल्या की "दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणास बसली आहे.जो पर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्य...

माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियानात प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूची भव्य कामगिरी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू (जि. परभणी) यांची "माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा 2 अभियानात उल्लेख नीय कामगिरी करीत या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे.या अभियानाचा उद्देश शाळांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता, आणि पर्या वरणपूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा आहे. एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळा परिसरात हरित क्षेत्र वाढवणे, स्वच्छता मोहीम राबवणे, आणि शाळेच्या इमारतीची सुधारणा यासारख्या गोष्टींवर भर दिला. शाळेच्या यशाबद्दल व्यवस्थापन, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करा. - जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी

इमेज
कोल्हापूर, दि. 25 :  सर्व शिधावाटप दुकानामध्ये ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणिकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिधापत्रिका सोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकामध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी आधार प्रमाणिकरण (ई- केवायसी) होणे आवश्यक आहे. त्याआधारे शिधापत्रिकेमध्ये योग्य व्यक्ती असल्याची खात्री होईल. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी धान्य घेतेवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांसह नजिकच्या रास्तभाव दुकानात जावून दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेर आपले आधार प्रमाणिकरण (ई-केवायसी) पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.        जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 678 रास्तभाव धान्य दुकाने असून अन्नसुरक्षा लाभार्थी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये अंत्योदय योजनेच्या 51 हजार 874 व प्राधान्य कुटुंब योजनेचे एकूण 5 लाख 35 हजार 425 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामधील एकूण लाभार्थी संख्या 24 लाख 95 हजार 713 आहे. जिल्ह्यामध्ये प्रतिमाह सरासरी 95 टक्के धान्य उचल होत असून...

गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना केले चार्ज..__मा.खा.अशोक नेते यांची मंचावर उपस्थिती_

इमेज
गडचिरोली:-भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह आज (दि.24) नागपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते विराजमान होते. त्यात भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा पक्षाचे निवडणूक सहसंयोजक असलेले माजी खासदार अशोक नेते हेसुद्धा मंचावर स्थानापन्न होते. या कार्यकर्ता मेळाव्याला वरील मान्यवरांशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक संयोजक रावसाहेब दानवे, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्रसिंह यादव हे प्रामुख्याने मंचावर विराजमान होते. देशात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील कामांना जनतेपर्यंत पोहोचवून विरोधकांचे मनसुबे हाणून पाडण्याचे आवाहन यावेळी अमित शाह यांनी केले. या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा पनवेल येथे संपन्न . सारंग महाजन

इमेज
दि. 22 सप्टेंबर 2024  शगुन हॉल येथे संपन्न झाला.वर्षभरापूर्वी  दैनिक युवक आधार वृत्तपत्राने पनवेल शहरांमध्ये दिमाखात पाऊल ठेवून दर्जेदार बातम्या व लेख  वाचकांच्या पसंतीस  उतरले आहे.          अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटक नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ. ना .म . जाधव फाउंडेशन पनवेल विशेष उपस्थिती प्रसाद काथे संपादक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल ,विलास बडे सहसंपादक न्यूज 18 लोकमत, प्रशांत सागवेकर  वृत्त निवेदक जय महाराष्ट्र, पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँच पनवेल ,महेश जी सारणीकर माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष, अनिश गाढवे शिवसेना प्रवक्ते, नितीन शिंदे मधु तारा फाउंडेशन पुणे , साक्षी सागवेकर संस्थापिका परिणीता सोशल फाउंडेशन, दैनिक युवक आधारचे संपादक भारती संतोष आमले व संपादक संतोष आमले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून  शिवछत्रपती महाराज  व पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री  जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वर्धापन सोहळ्याचे ...

सेलू ते अंतरवाली सराटी भव्य मोटर सायकल रॅली.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी.  सेलू : आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी मराठा आरक्षणासाठी मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण बसलेले श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी  सेलू ते अंतरवाली सराटी अशी भव्य मोटर सायकल रॅलीचे आज सेलू तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने अयोजन करण्यात आले होते.त्या अवाहनास प्रतिसाद देत सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी  लावावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे हे जीवाची बाजी लावून सातत्याने उपोषण करत आहे.परंतु हे सरकार ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी वेलकाढू पणा करीत आहे. मा.जरांगे पाटलाच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज  सेलू ते अंतरवाली सराटी अशी भव्य मोटर सायकल रॅली   सेलू इथून सातोना लिंगसा, कराळा आष्टी कुंभारी पिंपळगाव, घनसावंगी वडोगोद्री ते अंतरवाली सराटी अश्या मार्गे उपोषण स्थळावर म्हणजे अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. या रॅली मध्ये सकाळ पासूनच हजरो सकल मराठा समाजातील तरुण मुले, नागरिक आपली मोटारसायकल घेऊन...

सेलूत ब्राम्हण समाजाचा आनंदोत्सव.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनीधी परभणी.  श्री.परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन. सेलू : राज्यातील  महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र श्री.भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.अनेक दिवसांपासूनचा ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला. या निर्णया बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे ही आभार मानण्यात आले.सेलू येथील ब्राह्मण समाज व श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,पेढे वाटून व फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सेलू तील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

हुपरी येथे सख्या भावाने केला खून ; दोघेजण ताब्यात

इमेज
हुपरी येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यानेच कौटुंबिक कलह, वाटणी व व्यावसायिक स्पर्धेतून मित्राच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे व शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी जलदगतीने तपास यंत्रणा राबवून काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी भाऊ पवन सुकुमार हालुंडे (वय २६) व त्याचा मित्र आनंदा शिवाजी खेमलापुरे (२२, दोघेही रा. वाळवेकरनगर हुपरी) यांना पोलिसांनी रविवारी रात्रीच संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर घटनास्थळावरून लंपास केलेली सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदीचे दागिने आनंदा खेमलापुरे याच्या घरातून जप्त केले. हुपरी पोलिसांनी या दोघांना अटक करून पुढील तपासांसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

एकसंबा शहरी पालिका स्वच्छता कर्मचारी दिन काल मोठ्या उत्साहात साजरा.

इमेज
चिकोडी तालुक्यातील एकसंबा या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पट्टण पंचायत कार्यालय एकसंबा  यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 23 सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून कार्यालयात साजरा करण्यात आला . प्रारंभी एकसंबा पटन पंचायत दिवंगत कर्मचारी कै. शंकर केरूमळी यांना उपस्थितांच्या वतीने मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रारंभी रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा सौ. सुजाता विनोद चितळे या उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी एकसंबा पट्टण पंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील सप्तसागरे हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाप्रसंगी पट्टण पंचायत एकसंबा शहराचे नगरसेवक विठ्ठल नाईक, शाहिदा मुल्ला, प्रेमा माळगे, राजश्री मगदूम, रवींद्र माने, जमीरशहा मकानदार, चिदानंद बेळी, उमेश सातवार, श्रीमती कलावती माळगे, अंकुश खोत, संगीता पवार, शकुंतला रंगोळी, किरण माने शिवगोंडा बावणे, रवींद्र खोत. यांच्यासह पालिका कर्मचारी मुख्याधिकारी बि के तवशे, एस डी सी चंद्रकांत शिरगुरे, सी...

बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचें रंगले कुर्ल्यात बाल -लोककला प्रशिक्षण.

इमेज
मध्यवर्ती बालरंगभूमीच्या अध्यक्षा माननीय सौ. निलमताई शिर्के -सामंत यांच्या प्रेरणेंतून बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेनें एक दिवसाचें बाल- लोककला प्रशिक्षण घेतलें ,तें गांधी बालमंदिर कुर्ला( पश्चिम) या शाळेंत. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतींपूजन व नटराज पूजन झालें .त्यानंतर गांधी बाल मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन आणि स्वागत गीत म्हटलें. बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनी प्रास्ताविक केलें. .गांधी बाल मंदिर शाळेचें मुख्याध्यापक श्री.प्रमोद पाटील सरांनी प्रशिक्षक प्रा.डॉ. शिवाजी वाघमारे सर,बृहन्मुंबई शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलें. शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनीही बृहन्मुंबई शाखेतर्फे श्री.प्रमोद पाटील सर,श्री. साखरे सर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलें. ज्योती निसळ यांनी आपल्या मनोगतांत लोककला म्हणजे काय? आणि हे प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय हे विशद केलें.     आणि मग प्रशिक्षक प्रा.डॉ.शिवाजी वाघमारे यांनी आपल्या खड्या, कणखर आवाजांत गण ,भारुड, गोंधळ सादर केलें.आणि मुलांनाही...

खोतवाडी हायस्कुल, खोतवाडी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित, खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.     यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा यांनी आपल्या मनोगतातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवना विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.    या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार श्री.हेमगिरे एस.के.यांनी मानले.

जनस्पंदन कार्यक्रमादरम्यान प्राप्त लोकांच्या तक्रारींचे निराकरण करा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन.

इमेज
रायबाग : जनस्पंदन कार्यक्रमादरम्यान प्राप्त झालेल्या लोकांच्या तक्रारींना तत्परतेने प्रतिसाद देऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.     नगरचे डॉ.  त्यांनी शनिवारी बाबू जगजीवनराम सभा भवन येथे आयोजित तालुकास्तरीय जनस्पंदना कार्यक्रमात सहभाग घेऊन संपूर्ण प्रशासन जनतेपर्यंत यावे व जनतेच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी जनस्पंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.   जनतेची शासकीय कार्यालयांची भटकंती टाळावी, या उद्देशाने जनसंपर्क उपक्रम सुरू करण्यात आला असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देऊन समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत.     यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, रायबागचे आमदार डी.एम.ऐहोळे, कुडचीचे आमदार महेंद्र थम्मनवर, एसी सुभाष संपगवी, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळ्ळी, तहसीलदार सुरेश मुंजे, टी.पी., ईओ अरुण माचकनूर, पी.पी.अध्यक्ष अशोक अनगडे आदी उपस्थित होते.

मधु ताराच्या कार्याची प्रशंसा पनवेल येथील दैनिक वर्धापनदिनात.

इमेज
दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दैनिक युवक आधार या नवीन पनवेल येथील वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांना पत्रकार श्री संतोषजी लांडे साहेब यांनी आमंत्रित केले. या वेळी राज्यभरातून पत्रकार मित्र तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मधु ताराच्या कार्याची दखल घेत दैनिक युवक आधारचे प्रमुख संपादक श्री संतोषजी आमले साहेब यांच्या हस्ते मधु तारा प्रमुख यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या वेळी मधु तारा सोबती निराधारांना सांभाळणारे निराधार सेवा सदन फाऊंडेशन पनवेलचे डॉ श्री संजयजी शर्मा.परिणीती फाऊंडेशन प्रमुख पनवेलच्या साक्षी सागवेकर.पनवेल क्राईम ब्रेंचचे पोलीस निरीक्षक श्री संजयजी चव्हाण साहेब.माहिती अधिकार व पत्रकार सौरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री महेशजी सारणेकर.राज्य संघटक प्राचार्य जगन्नाथजी रासवे.श्री संतोषजी लांडे.श्री सारंगजी महाजन.श्री गणेशजी दळवी.श्री विशालजी ताटके आदी उपस्थित होते.

श्री जय भवानी नवरात्र मोहत्सव:सेलूतील श्री संत गोविंद बाबा चौकात भूमी पूजन कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : सेलू येथील श्री संत गोविंद बाबा चौक मठ गल्ली मंडप व भूमिपूजन आज धनंजयसिंह बायस ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यंदा मंडळाचे 41वे वर्ष  आहे.मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष स्व.प्रकाशसिंह भैया ठाकुर यांनी 1984 वर्षी केली होती तेव्हापासून आज पर्यंत अखंडित पारंपारिक नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. असे मंडळाच्या वतीने नागेश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी गणेशसिंह ठाकुर, रूपाली ठाकूर,मनीषा बायस, संध्या ठाकूर, अशोक शेलार, इंद्रजीत ठाकूर, आदित्य कुलथे ,रितेश शेंडुते,शक्ती बोराडे, विशू ठाकूर,संतोष नोकवाल, ओम गायकवाड, जतीन काकडे, शक्ती पवार,अर्जुन ठाकूर आदी उपस्थित होते.

दै.परतगंगा व दै.ग्रामदेवताचे संपादक श्री.सखाराम जाधव यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर.

इमेज
कोल्हापूर -राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि  जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या वर्षीचा 2024 चा राज्यस्तरीय आदर्श संपादक म्हणुन दै.परतगंगा व दै.ग्रामदेवताचे संपादक श्री .सखाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा वितरण सोहळा कोल्हापुर येथे मान्यवंराच्या उपस्थित होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी माहिती दिली.या वेळी अनिता काळे,रुपाली निकम ,संजय सासने,संभाजी थोरात,शिवाजी चौगुले,महादेव चक्के,भगवान  माने आणि श्रीकांत माजगांवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त पुरस्कारकर्ते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा , महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करणेत आलेले आहेत.  याकरीता सामा...

बंद बंगल्याचा कडी कोयंडा तोडून रोख रक्कम लंपास

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी - व्यंकटेश नगर न्यू वाडदे येथे काल मध्यरात्री बंद बंगला फोडून धाडसी चोरी झाली आहे. मुंबई येथील वकील  सुहास कामत यांचा हा बंगला असून काही दिवसापूर्वी ते गणेशोत्सव सुट्टीसाठी आले होते. चारच दिवसांपूर्वी ते कुटुंबियासह मुंबईला निघून गेले.बंगल्यात कोणी राहत नसल्याचा व रस्त्यावरील लाईट बंद असल्याच्या संधीचा फायदा घेऊन गॅस कटरच्या साह्याने पश्चिमेकडील गेटचे लोक तोडून चोरांनी आत मध्ये प्रवेश केला. मुख्य दरवाजाचा लोखंडी दरवाजा ही त्यांनी तोडले. बेडरूम मधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. बेडरूममधील कपाट फोडून रोख रक्कम लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.

हुपरी येथील गिरीबुवा माळी मळा रोडवरील विहिरीमध्ये एका महिलेचा मृत्यूदेह आढळला

इमेज
हुपरी वृत्तसेवा - हुपरी येथील सुमन दिलीप कोरवी (वय वर्ष 45) राहणार गजरे गल्ली हुपरी या 20/09/2024 रोजी 4 वाजण्याच्या पूर्वी हुपरी ते एमआयडीसी जाणाऱ्या रोडवर असलेले  माळी बुवा मळा येथील कुलकर्णी यांच्या विहिरीत पडून  त्यांचा बुडून मृत्यू झाला याबाबतची फिर्याद त्यांचे पती  दिलीप दगडू कोरवी (राहणार गजरे गल्ली हुपरी)  यांनी दिली असून अधिक तपास पोहेकॉ कांबळे व पोहेकॉ गस्ते करत आहेत.

यशासाठी सदृढ मन आणि बुद्धी गरजेची : प्रा.डॉ.जीवन पाटील . दि न्यू हायस्कूल मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  :                  शिक्षण हे संस्कारशील नागरिक बनण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांशी सुसंवाद स्थापित करणे गरजेचे आहे. सदृढ मन आणि बुद्धीच्या जोरावर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ.जीवन पाटील यांनी केले. दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे * "शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या" * या विषयावर आयोजित समुपदेशन व्याख्यानात प्राध्यापक जीवन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक  बी. ए. कोळी होते.      व्याख्यानात प्रा. डॉ. जीवन पाटील पुढे म्हणाले, शालेय जीवनामध्ये मनाची एकाग्रता आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि अन्य प्रसार माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा संतुलित वापर करावा. पालक व शिक्षकांशी आपल्या समस्यावर विद्यार्थ्यांनी संवाद करणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ.जीवन पाटील यांनी पालकांच्या समोर विद्यार्थ्यांना सदवर्तनाची शपथ दिली. त्यावेळ...

दानोळी येथील कलगोंडा कवंदे यांच्या म्हैशींने दोन मादी रेडीनां दिला जन्म .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) दानोळी ( ता . शिरोळ ) येथील प्रतिष्ठित नागरीक कलगोंडा आण्णा कवंदे यांच्या घरच्या देशी म्हैशींने चक्क दोन मादी रेडीनां जन्म दिला . कवंदे कुटूंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला , व कवंदेसह कुटूंबीयांत एक आनंदाचे वातावरण पसरले .                      कलगोंडा कवंदे व त्यांचे कुटूंबीय यांना जनावरांची फार आवड आहे . तसेच ते आपल्यासारखीच या मुक्या जनावरांची काळजी व देखभाल करत होते . त्यांची घरची देशी जातीची म्हैस आहे . या म्हैशींने पहिल्यांदा एक रेडीला जन्म दिला होता . हिच म्हैस दूस-यांदा गाभण राहीली तेव्हांपासून कवंदे हे तीची देखभाल व काळजी घेत होते . सदर म्हैशींने दहा महिने सात दिवस घेऊन चक्क दोन मादी रेडीनां जन्म देऊन कवंदेसह कुटूंबीयांना आनंदाचा धक्काच दिला . सध्या म्हैस व दोन रेडी हे सुखरूप व्यवस्थित आहेत . दानोळी गावात हि वार्ता पसरताच नागरीक आश्चर्यचकित होऊन पहाण्यासाठी गर्दी करत होते .

नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे लवकरात लवकर काढा, नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी करता दहा हजार सानुगून अनुदान द्या,कामगार संघटनांची मागणी

इमेज
इचलकरंजी प्रतिनिधी - नोंदणीकृत बांधकाम कामगारांची प्रलंबित कामे लवकरात लवकर काढा, नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळी करता दहा हजार सानुगून अनुदान द्या, पेटी व भांडी वाटप इचलकरंजी मध्ये सुरू करा या मागणीसाठी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज दिनांक 20 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त मा.  जानकी भोईटे यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन देण्यात आले             इचलकरंजीतील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये अतिशय धीम्या गतीने कामे सुरू आहे या कार्यालयाकडे विविध लाभाचे ११४९२, नवीन नोंदणीचे 9712 व नूतणीकरणाचे 8590 अर्ज पेंडिंग आहेत. लाभाचे तर  नोव्हेंबर 2023 पर्यंतच तपासणी केली आहे. यामुळे येथील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती करिता या  कार्यालयात हेलपाटे  घालावे लागत आहेत. सदरचे सर्व अर्ज आठ दिवसात तपासणी करून निकाली न काढलेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला            यावेळी शिष्टमंडळात राजेंद्र निकम, आनंदा गुरव आकाश बनसोड...

जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्या.बोरगाव ता.वाळवा जि.सागली या संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इमेज
विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी नंदिनी चव्हाण कुंभोज. जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित बोरगाव ता.वाळवा   जि.सागली या संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार यावेळी संस्थेचे संचालक प्रदीप पाटील यांनी स्वागत केले सचिव विजय पाटील यांनी नोटीस वाचन केले संस्थेचे संचालक मिलिंद बनसोडे सर यांनी श्रद्धांजली वाचन केले संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर फाणै यांनी अहवाल वाचन केले सहसचिव संभाजी थोरात यांनी ताळेबंद नफा-तोटा पत्रक जादा झालेल्या खर्चास मंजुरी व सन 2024-2025 साला करिता तयार केलेले अंदाज पत्रक वाचुन दाखविले तसेच STI पदी निवड झालेबदद शुंभम पाटील जिल्हा परिषद ग्रामसेवक पदी तबुसो मुल्लाबोरगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदी राजेंद्र वाटेगावकर रायगड पोलीस अमर पाटील,SRPF पोलिस निखिल घाडगे शुभंम लोंढे, ऋत्विक कांबळे तसेच SSC परिक्षेत गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला*या सभेसाठी संस्थापक माणिकराव पाटील (अण्णा) अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष सुधीर फाणै संचालक मंडळ इतर संस्थाचे पदाधिकारी सभासद कर्मचारीउपस्थित होते आभार संचालक अमोल पाटील यांनी मानले

महाराष्ट्रातील फेमस गायक कुणाल पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार .

इमेज
अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे जॉब करून आपल्या गायनाची आवड पूर्ण करणारा कुणाला पाटील आज 2000 पेक्षा जास्त गाणी गात आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून ऑर्केस्ट्रा मध्ये गात असून कुठलेही गायनाचे शिक्षण  नसताना आज महाराष्ट्राचा फेमस सिंगर  आहे.                 मराठी गीत ,कोळी गीत, हिंदी भाषेतील गाणे, भोजपुरी या सर्व भाषेतील गाणे मदन पाटील स्टुडिओ अक्षय रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये त्याचे खूप गीत रेकॉर्ड केले आहे त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्र फेमस झालेले कुणाल पाटील यांचे लोकगीत ऑंटी माझ्या झोपडीत ये ना गाण्याने लोकांना वेड लावल आहे बाळूभाई ग्रुप ,देवाग्रुप, टायगर ग्रुप आणि इतर ग्रुपचे गाणे गायले आहे. जालना किंग गजूभाऊ तौर यांचं गाणं गायले असून या गाण्याला महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून कुणाल पाटील यांना प्रसिद्धी मिळाली आहे .असा कोणता जिल्हा तालुका नाही जिथले गीत कुणालने गायले नसेल. आमदार खासदार मुख्यमंत्री इतर समाज सेवकांची सुद्धा तसेच वाढदिवसाचे गाणे गायले आहे. दिवसेंदिवस कुणाल पाटील यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आ...

नंदीकुरळी शासकीय कन्नड बॉईज वरिष्ठ प्राथ. शाळेचे सहशिक्षक रामचंद्र रुपाले यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ जाहीर

इमेज
रायबाग : तालुक्यातील नंदीकुरळी गावातील शासकीय कन्नड बॉईज वरिष्ठ प्राथमिक शाळेचे सहशिक्षक रामचंद्र रुपाले यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.    कर्नाटक भाषिक मायनॉरिटीज स्कूल वेल्फेअर असोसिएशनने तेवीस वर्षांच्या अखंड सेवेचा गौरव केला.  कर्नाटक सावित्रीबाई फुले शिक्षक संघ.  व तालुका गुरू स्पंदन बळग यांच्या सहकार्याने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   तालुका शिक्षकांनी अभिनंदन केले.

पुणे निवासी रौनक पटेल न्यू यॉर्क मध्ये सन्मानित

इमेज
      दि.12 सप्टेंबर 2024 भारत प्रधान कौसलावास न्यू यॉर्क येथे हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले असून पुणे  निवासी सध्या न्यू यॉर्क मध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेले रौनक पटेल यांना हिंदी दिवसानिमित्त  उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.            न्यू यॉर्क येथे कला क्षेत्राची ज्ञान व आवड असलेले रौनक पटेल नाट्यसृष्टीत मध्ये काम करत आहे. पुढे चित्रपटसृष्टीतही पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत आहे अशी यशस्वी वाटचाल चालत राहो ही शुभेच्छा. पुणे तेथील रौनक यांचे मित्र सुप्रसिद्ध मराठी कलाकार आनंद बुरड यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या

कंकणवाडी शहरातील शासकीय उच्च माध्यमिक शाळेसाठी बांधण्यात आलेल्या शाळा खोली चे आमदार डी. ऐहोळे यांच्या हस्ते उद्घाटन.

इमेज
रायबाग : तालुक्यातील कंकणवाडी शहरातील शासकीय उच्च माध्यमिक शाळेसाठी विवेका योजनेअंतर्गत 17.20 लाख रुपयांच्या अनुदानातून नवीन 1 शाळा खोली बांधून आमदार डी.  ऐहोळे यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.  पी.पी.च्या अध्यक्ष प्रकाश हुक्केरी, उपाध्यक्ष रामा नायक, राजशेखर खंडाळे, अप्पासाब बॅकुडे, के. बी. देसाई, मोहनराव देसाई, सदाशिव घोरपडे, अण्णासाहेब खेमलापूर, महेश करमाडी, महालिंग मुद्दापुरे, हलप्पा पीरगिमानपाटील, एस.पी. गोंधळात सामील झाले

गणरायाच्या निरोप मिरवणुकीचे विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे भव्य स्वागत.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :दहा दिवसाच्या विसाव्यानंतर काल बाप्पा नी निरोप घेतला, सेलू शहरातील गणेश मंडळांनी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला,या सर्व मिरवणु कीचे स्वागत विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे करण्यात आले.यात अध्यक्ष उपाध्यक्षांना फेटे, हार तसेच शंकर पार्वती व गणपती यांची एकत्रित प्रतिमा स्वागत करताना दिली,मंडळांच्या सदस्यांसाठी डिजे, फुलांची उधळण व प्रेक्षकांसाठी जादूचा शो आयोजित केला होता.सेलू शहर हे सांस्कृतिक शहर आहे. याचा प्रत्येक  कालच्या मिरवणुकीतील शिस्तीने आला.यावेळी   मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सेलू बसस्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनीक्षेपक सुरू करणे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  बसण्यासाठीआसन व्यवस्था करण्याची मागणी.   सेलू : दि. 18 आज रोजी  सेलू येथील बस स्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनिक्षेपक मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वयस्कर लोक, महिला, बसने ये जा करणारे शाळेतील विद्यार्थी, तसेच ज्यांना वाचता येत नाही. अशांना अनेक अडच णी येत आहेत. सेलू हे मोठे शहर असून बस स्थानकाची इमारत खूप मोठी आहे. पण माहिती देणारे  ध्वनि क्षेपक  बंद असल्यामु ळे ही फक्त शोभेची वस्तू बनली आहे. प्रवासांना बसण्यासा ठी आसनाची व्यवस्था ही फारच तोकडी आहे. अबाल वृद्धांना बसण्यासाठी आसनाची आणखी गरज आहे. सेलु बस स्थानकावरील ध्वनि क्षेपक ताबडतोब सुरू करण्यात यावे व प्रवाशांची गैरसोय थांबवावी. तसेच  बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नाही व जी आसन व्यवस्था आहे ती मोडकळीस आली आहे त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने जमिनीवर बसावे लागत आहे करोडो रुपये खर्चून बस स्थानकाची नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे पण त्यात सुविधांचा अभाव आहे तरी तात्काळ बस स्थानका तील ध्वनिक्षेपक व आसन व्यवस्था येत्या...

प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आधुनिक पद्धतीने रिमोटकंट्रोल बोटीच्या माध्यमातून केले गणपतीचे विसर्जन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : शहरातील  श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा गणेश विसर्जना च्या अनोख्या  पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रिमोटकंट्रोल बोटीच्या साहाय्याने गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आधु निक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या सांस्कृ तिक उत्सवाला एक नवीन दिशा दिली आहे.विसर्जनाच्या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, डॉ संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनातून वर्ग नववी तील विद्यार्थी प्रणव मुजमुले याने हा प्रयोग शाळेतील रोबो टीक लॅब मध्ये हा तयार केला. या रिमोट कंट्रोल बोटीद्वारे श्री गणेशाची मूर्ती दूधना नदी मध्ये नेण्यात आली व नंतर रिमोटच्या सह्यायाने विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यावेळी म्हणाले, "विद्यार्थ्यांनी केलेली ही कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम ...

हुपरी नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने गणेश विसर्जन नियोजनबद्ध व्यवस्था

इमेज
हुपरी नगरपरिषद व हुपरी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने हुपरीतील सर्व गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती यावेळेस लिपिक उदय काबंळे,व दिगबंर डोगंरे हे स्वता लक्ष घालुन  या ठिकाणी जवाहर कारखान्याच्या शेजारी असणारा कालव्याच्या जवळ  हुपरी पोलीस स्टेशन यांचे कॉ.काबंळे व इतर होमगार्ड हे पोलीस निरीक्षक एन.आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता  हुपरी नगरपरिषद मार्फत येणाऱ्या प्रत्येक मंडळास श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.  यावेळी उत्साही व उत्कंठा वर्धक वातावरणात हुपरीतील श्री गणेशाचे विसर्जन नीट नियोजनबद्ध व पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.  गेली 11 दिवस गणेशाच्या पूजनाचे आज शेवटच्या दिवशी निरोप घेताना मंडळातील लहान थोर यांना जड अंतकरणाने आज श्री गणेशाला निरोप देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे  प्रशांत तराळ, प्रशासकीय अधिकारी  रोहितकुमार कनवाडे,लेखापाल  प्रसाद पाटील,पाणीपुरवठा अभियंता क्षितीज देसाई,  संगणक अभियंता ज्योती पाटील, ...

हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी विनम्र अभिवादन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  प्रशासणाच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन. सेलू ÷ शहरातील ऐतिहासिक घडीटाॅवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी न .प .प्रशासण व महसूल प्रशासनाच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन दि १७ सप्टेंबर रोजी     पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उप जिल्हा अधिकारी संगी ता सानप, तहसीलदार शिवाजीराव मगर, न .प. मुख्याधीकारी युवराज पौळ , माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मंडळ अधिका री मुकुंद आष्टीकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, माजी सैनिक रमेशराव काकडे, नायब तहसी लदार विजयराव मोरे  जेष्ठ पत्रकार नारायण राव पाटील, उप मुख्या धिकारी भगवान  अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रान्त अध्यक्ष डाॅ.विलास मोरे,तालुकाध्यक्ष सतीश जाधव,राजेंद्र पवार, डाॅ.शिवाजीराव शिंदे, प्रदिप शिंदे, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, रघुनाथ बागल,  रघुनाथ देशमुख, के डी,वाघमारे विक्रांत पाटील, नागोराव देशमूख, डाॅ अरविंद बोराडे,सुभाष फोपसे, आदि उपस्थित होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सह...

डासाळा येथे गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू तालुक्यातील  रामनगर डासाळा येथे आज दि. 16 सप्टें.रोजी  शंभु राजे प्रतिष्ठान एकता गणेश मित्र मंडळ रामनगर येथे सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने गणपती आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामनगर डासाळा येथे सर्व हिंदू मुस्लिम एकतेने राहतात हे आज पुन्हा एकदा पहावयास मिळालेलं जिवंत उदाहरण आहे. या गावांमध्ये कुणाच्याही सुखदुःखामध्ये अशाच एकरुपतेने सर्वजण मिळून कार्य करत असतात. या गावातून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की जात पात महत्त्वाची नसून माणुसकी धर्म हीच खरी जात आहे. शंभु राजे प्रतिष्ठान च्या वतीने वेळोवेळी काही ना काही उपक्रम राबवले जातात. आता च साजरा झालेला शिक्षक दिन सुद्धा पीएम श्री डासाळा येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आगळावेगळा साजरा करण्यात आला होता. आणि आज सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आरती व महाप्रसादाचे आयोजन सुंदर अशा पद्धतीने करण्यात आले होते. सर्व मुस्लि म बांधवांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे या गावानी सर्वाना एक एकतेचा संदेश दिला आहे आपण सर्व एक आहोत म्हणून जात पात न पाळता माणुसकी हाच धर्म आ...

कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुप तर्फे नृसिंहवाडी पवित्र दत्तदेवस्थान येथेसिताफळ, लिंब, आंबा, गुलाबाची झाडे लावून वृक्षारोपण

इमेज
ArliEn kA कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान ग्रुप तर्फे नृवासिंहवाडी पवित्र दत्तदेवस्थान येथे फळ झाडे सिताफळ लिंबाचे झाड कलमी आंबा हापूस आंबा गुलाबाची झाडे अशी  नाना तऱ्हेची झाडे लावून वृक्षारोपण केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार यांनी उपस्थित लोकांना निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाकडून झाडांकडून कशी सकारात्मक ऊर्जा मिळते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन मिरज सोनी गावामध्ये भवानी मंदिर येथ प्रस्थान केले.  कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ. रोहिणी अमोल पराडकर यांनी तिथे जमलेल्या महिलांना आज कालच्या महिला सुरक्षित आहेत का? त्यांच्यावर होणारे अत्याचार या विषयावर  काही प्रश्न विचारून चर्चासत्र आयोजित केले.  तिथे जमलेल्या गावातील महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि आपले विचार मांडले.  तेथील शाळेतले शिक्षक अध्यक्ष व सरपंच ताई शारदा यादव याही हजर होत्या. सुलोचनाताई व सरपंच शारदाताई यांचा  शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सौ. सुलोचना पाटील ताईंनी के...