शरद कारखाना मार्फत पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मजरेवाडी येथे चारा वाटप

मजरेवाडी/ सचिन मठपती


        माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या प्रयत्नातून शरद सहकारी साखर कारखाना मार्फत व पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील पुरग्रस्त जनावरांना चारा वाटप करण्यात आले.कुरूंदवाड , मजरेवाडी व परिसरातील अनेक पुरग्रस्त आपल्या जनावरासह विस्थापित झाले आहेत.महापुरामुळे ओला चारा उपलब्ध होत नव्हता त्याची दखल घेऊन मजरेवाडी येथील कारखान्याकडे नोंद असलेली शेतकरी सुहास पट्टणकुड्डे यांच्या प्लाट मधील ऊस चा-यासाठी उपलब्ध करून दिल्याने पुरग्रस्तातून प्रशासन व शरद कारखाना टिमचे कौतुक होत आहे.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सुपुत्र यड्राव बॅंकेचे चेअरमन अजय पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते पुरग्रस्त जनावरांसाठी  वैरण वाटप करण्यात आला.यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रवींद्र देशमुख,पशुधन विकास अधिकारी डॉ. जितेंद्र कुरुंदवाडे, डॉ. प्रकाश पाटील, कुरुंदवाड मंडल अधिकारी बबन पटकारे, तलाठी संत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.