यड्राव येथे विविध ठिकाणी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन .

यड्राव (प्रतिनिधी ) येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले .                              लोकशाहिर आण्णा भाऊ साठे युवक मंडळ व समाजाच्या वतीने साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस सरपंच कुणालसिंह नाईक - निंबाळकर व माजी जि . प . सद्स्य राजवर्धन नाईक - निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .                        यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निंबाळकर यांनी समाजसुधारक साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करुन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .                                       यानंतर कुमार विद्यामंदिर शाळेच्या  शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ प्रिती प्रशांत आदमाने यांची निवड झालेबद्दल समाजाच्या वतीने ग्रा . प . सद्स्या मंगल कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .           यावेळी ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक सुधीर आदमाने , राहुल माने , रोहन आदमाने , निशांत आदमाने , प्रेम आदमाने , यश आदमाने , प्रतिक आदमाने , व सर्व समाज बांधव उपस्थित होते .                    सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक उत्तम जगताप यांनी केले तर रोहित आदमाने यांनी आभार मानले .                                    
       तसेच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रा . प .सद्स्य दत्ता कोळी यांनी लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .                                       
    यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निंबाळकर , ग्रा प . सद्स्य रंगराव कांबळे , मंगल कांबळे , पत्रकार उत्तम जगताप , ग्रा . प . कर्मचारी जगदिश मुळे , सतीश भोसले , प्रसाद पोवार उपस्थित होते .                 यानंतर इंदिरानगर (बेघर वसाहत ) येथे साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस समाजाचे जेष्ठ नागरिक सुरुप आदमाने व ग्रा . प . सद्स्या मंगल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .               
     यावेळी ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , निशांत शिंदे , नितीन बिरांजे , अक्षय भोसले (मेजर ) , अर्जुन आदमाने , बाळासाहेब कांबळे , चंद्रकांत लोखंडे , तानाजी सोनूले , लहू आदमाने , मधूसुदन झुटाळ , जितेद्रं भोरे तसेच सर्व समाज बांधव व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.