कारदगा ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीस कुलूप

कारदगा प्रतिनिधी

कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक 190 या वर्गखोलीस कुलूप लावण्यात आले. सदर अंगणवाडीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुजाता राजेंद्र पडलिहाळे यांची नियमाबाहेरित्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी अन्यथा कुलूप काढण्यात येणार नाही असे लेखी निवेदनाव्दारे  ग्रामपंचायतीतर्फे वरीष्ठांना कळविण्यात आले आहे.
        याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी ग्राम पंचायत
अध्यक्षा व उपस्थित सदस्यांच्या पुढाकारणे येथील अंगणवाडी क्रमांक 190 ला कुलूप लावण्यात आले आहे. 
 या अंगणवाडी शिक्षिका पदासाठी गळतगा गावातील अंगणवाडी सहाय्यक सुजाता राजेंद्र पडलिहाळे यांना बेकायदेशिररीत्या कारदगा येथील अंगणवाडी वर्ग क्र. 190 मध्ये बढती देण्यात आली आहे.  त्यांच्याकडे सदलगा गावातील शिधापत्रिका व गळतगा गावचे कायमस्वरूपी निवडणूक ओळखपत्र आहे. सदर माहिती मा.उपसंचालक बालविकास विभाग कार्यालय बेळगाव, मा.तहसीलदार साहेब निपाणी , मा.बाल विकास प्रकल्प अधिकारी निपाणी यांना यापूर्वी अनेकदा पत्र देऊनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देवुन सदर भरती ( बढती) रद्द न केल्यास आपण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडेही लेखी तक्रार केली असल्याचे सांगितले.
    माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी कारदगा गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष व सदस्य एकत्र येऊन बेकायदेशीर नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी अंगणवाडी क्र. 190 च्या दरवाजाला टाळे ठोकले आहेत. जोपर्यंत कारदगा गावातील स्थानिक महिलेस प्राधान्य मिळणार नाही तोपर्यंत हे कुलुप काढले जाणार नाही. तसेच सदर अंगणवाडी सेविकेवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही सगळे येथे उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार, उपाध्यक्ष किरण टाकळे, सदस्य सुभाष ठकाणे,  पांडुरंग वडर , ज्योतीराम अलंकार, महादेव डांगे, सुनिल उगळे, संजू नेजे, बजरंग शिंदे, प्रकाश कुऱ्हाडे, रशिदा पटेल, सुजाता वडर, वीरश्री खिचडे, यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.