जलालपूर गावातील डी.जे.हेरवडे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आमदार डी.एम.इहोळे यांच्या हस्ते बूट व मोजे वाटप
रायबाग : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या अध्यापनासह अभ्यासक्रमेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे मत आमदार डी.एम.इहोळे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील जलालपूर गावातील डी.जे.हेरवडे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना चपला व मोजे वाटप करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले.
मुख्याध्यापक व्ही.बी.बनशंकरी, ग्रा.पं.उपाध्यक्ष मौलाना नदाफ, सदाशिव घोरपडे, मल्लू जगदाळे, राजू जाधव, नामदेव कांबळे, बसवराजवण्णा, पांडुरंग हवालदार, बसगौडा पाटील, बाबुराव अंबरगे, नानासाब सोनार, विनायक पवार, रोहीतराम पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या