व्यवसाय शिक्षण अंतर्गत कोहिनूर रोप फॅक्टरी येथे क्षेत्रभेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


कस्तुरबा गांधी विद्या लयाचा शालेय उपक्रम. 

 सेलू : दिनांक 6 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी सेलू शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 50 विद्यार्थिनींनी व्यवसाय शिक्षण अंतर्गत रस्सी कारखाना येथे भेट दिली. या वेळी बालिकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. बालिका सोबत व्यवसाय प्रशिक्षक श्रीमती शितल अव चार,अनुसया शिंदे, अनिता काळे, कला शिक्षक पांडूरंग पाटणकर हे उपस्थित होते.कच्चा मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात, 4 MM दोर पासून ते 40MM  दोर कसा बनतो. तयार माल पॅकिंग करून विक्री कसा केला जातो. परदेशात या मालाची निर्यात कशी होते. कोहिनूर आणि मनोरमा या दोन कारखान्यांमध्ये  दोन शिफ्ट मध्ये येथे 2000 व्यक्तींना रोजगार दिला जातो. आदि बाबीं विषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. व्यवस्थापक वल्लभ शेठ बाहेती यांनी उपस्थितांचे स्वागत केले.शैलेश विटेकर, राजू बुरकुले,अमोल हजारे यांनी बालिकांना माहिती दिली.तर आभार साक्षी टाकरास हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्या ध्यापक सुनीता वेडे , सुमित्रा पवार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.